दानवेंचा अहंकार जपण्यासाठी त्या पाच पोलिसांचा बळी?

गेल्या काही महिन्यातल्या जिल्ह्यातील घटना बघितल्या तर दोन मातब्बर नेत्यांच्या राजकारणात जालना पोलिस भरडले जात असल्याचे स्पष्ट होते.
Bjp Minister Raoshaeb Danve News Jalna
Bjp Minister Raoshaeb Danve News Jalna

जालना ः पत्रकार मारहाण प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफ्राबाद येथील संपर्क कार्यालयात पोलिस धडकले. आरोपी या कार्यालयात दडून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे आपण झाडाझडती घेतली, असा खुलासा निलंबित पोलिस उपनिरीक्षकाने केला आहे. (The victim of those five policemen to protect the ego of the Minsiter Danve?) जर त्यांचा दावा खरा असेल तर मग केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पोलिसांना तपास कामात सहकार्याची भूमिका का घेतली नाही? उलट माझ्या कार्यालयाची झाडाझडती का घेतली? हा विषय प्रतिष्ठेचा करत दोन पोलिस उपनिरिक्षक आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांची थेट लेखी तक्रार जालना पोलिस अधिक्षकांकडे करत त्यांना निलंबित करायला भाग का पाडले? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

मंत्र्यांच्या कार्यालयाची झडती घेतली, म्हणजे त्या पोलिस कर्मचाऱ्यांना काय गुन्हा केला? की ज्यामुळे त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करावी लागली. या सगळ्याच गोष्टींचा उलगडा होणे गरजेचे आहे. (Bjp Central State Minister Raosaheb Danve) परंतु  मंत्र्यांचा अहंकार जपण्यासाठीच या पाच पोलिसांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बळी दिल्याचे बोलले जाते. बर भाजयुमोच्या कार्यकर्त्याला जालना पोलिसांनी अमानूष मारहाण केल्यानंतर स्थानिक  नेत्यांपासून राज्यपातळीवरील नेत्यांनी या घटनेचा निषेध करत संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली.

राज्याच्या गृहविभागाने देखील गंभीर दखल घेत मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्माचाऱ्यांचे निलंबन केले. (Jalna Police) मारहाणीचे सबळ पुरावे, व्हिडिओ चित्रीकरण संपुर्ण राज्यात व्हायरल झाल्यामुळे या अमानुष मारहाणीबद्दल संतप्त प्रतिक्रिया देखील सामान्यांमधून उमटल्या होत्या. मात्र दानवे यांच्या संपर्क कार्यालायची झडती घेतली म्हणून ज्या पाच पोलीसांवर निलंबनाची कारवाई झाली, त्याबद्दल मात्र काहीसा नाराजीचा सूर उमटतांना दिसतो आहे.

वाळू माफियांची चोरी उघडकीस आणणाऱ्या जाफ्राबाद येथील एका पत्रकाराला ज्या पद्धतीने लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली, तो प्रकार देखील भयंकर आणि संताप आणणारा होता. या प्रकरणातील आरोपींचा वाळू माफिया आणि राजकीय पक्षांशी संबंध असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने स्थानिक पत्रकाराला मारहाण झाली, ते पाहता पोलिांनी तातडीने संशियत आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. हो शोध घेत असतांना आरोपी भाजपच्या कार्यालयात लपून बसल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही तातडीने तिथे धाव घेतली, असे निलंबित पोलीस सांगत आहेत.

तर दानवे यांच्याकडून मात्र पोलीसांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करत कार्यालयातील फायली, निवेदन आणि डेटा नेल्याचा आरोप तक्रारीत केला. ११ जून रोजीच्या झाडाझडतीची दानवे यांनी १२ रोजी पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली आणि १४ जून रोजी पाच जणांचे निलंबन करण्यात आले.  दोन दिवसांत चौकशी करून थेट निलंबनाची कारवाई केल्याने जालना पोलिसांच्या या वेगवान कामाचीही या निमित्ताने चर्चा होऊ लागली आहे.

नेत्यांच्या राजकारणात पोलिस टार्गेट..

गेल्या काही महिन्यातल्या जिल्ह्यातील घटना बघितल्या तर दोन मातब्बर नेत्यांच्या राजकारणात जालना पोलिस भरडले जात असल्याचे स्पष्ट होते. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व त्यांच्याच पक्षाचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील अंतर्गत गटबाजीमुळे पोलिस अनेकदा अडचणीत सापडले आहेत. परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर त्याने गुटखा साठवून ठेवल्याच्या माहितीवरून एका पोलिस अधिकाऱ्याने धाड टाकली होती. त्यावेळी लोणीकरांनी त्या अधिकाऱ्याला फोन करत धारेवर धरले होते.

तेव्हा या दोघांमधील मोबाईलचे संभाषण चांगलेच व्हायरल झाले होते. दुसरी घटना गेल्या महिन्यातच घडली. भाजयुमोचा पदाधिकारी असलेल्या नारियलवाले याला पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.  या प्रकरणात देखील लोणीकर यांनी पुढाकार घेत संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ या सर्वच नेत्यांनी हे प्रकरण लावून धरले होते.

राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही? असा सवाल करत फडणवीस यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. मात्र यावेळीही दानवे-लोणीकर यांच्यातील वाद आणि अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. दानवे यांनी नारियलावलेला भाजपचा पदाधिकारी म्हणून नका, अशी भूमिका घेत या प्रकरणावर मौन बाळगत एकप्रकारे पोलिसांची पाठराखणच केली होती. तर दुसरीकडे लोणीकर यांनी मात्र हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेत आक्रमक भूमिका घेतली होती.

आता दानवेंच्या संपर्क कार्यालयाच्या झाडाझडती प्रकरणात लोणीकर गप्प आहेत. दुसरीकडे काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांनी देखील या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. एकंदरित नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाचा फटका पोलिसांना बसत असून त्यामध्ये नाहक त्यांचे बळी जात आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com