वैशाली मोटे यांची गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या राज्य पर्यवेक्षक मंडळावर निवड

महिलांच्या अत्यंत महत्वाच्या विषयासंदर्भातील प्रश्नासाठी वैशाली मोटे यांना निवडण्यात आल्याने त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
Ncp Vaishali Mote News Osmanabad
Ncp Vaishali Mote News Osmanabad

उस्मानाबाद ः वैशाली राहुल मोटे यांची गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्याच्या राज्य पर्यवेक्षक मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत महत्वाच्या मंडळावर मोटे यांची निवड झाल्याने त्यांच्या आजवरच्या कामाची दखल पक्षाने घेतल्याचे दिसुन येत आहे. (Vaishali Mote elected to State Supervisory Board for Prevention of Gestational Diagnosis Act)  खासदार सुप्रिया सुळे यांच्या यशस्विनी अभियानाच्या माध्यमातुन वैशाली मोटे यांनी जिल्ह्यामध्ये विशेषतः भुम,परंडा व वाशीमध्ये चांगले काम केले आहे.

महिलाना स्वयंपुर्ण बनविण्यासाठी हे अभियान काम करत असुन त्यामध्ये पहिल्यापासुन मोटे यांनी सहभागी होत महिलांनाही लाभ मिळवुन दिला आहे. आता राज्य पातळीवरील मंडळावर त्याची नियुक्ती झाल्याने निश्चितपणे त्याना काम करण्यास वाव मिळणार आहे.(Along with her, the board consists of three women MLAs Manisha Kayande, Praniti Shinde and Saroj Ahire.) या मंडळावर त्यांच्यासह तीन महिला आमदार मनिषा कायंदे, प्रणिती शिंदे व सरोज अहिरे यांचा समावेश आहे.

डॉ. निशिगंधा वाड, डॉ.आशाताई मिरणे, डॉ. नंदीता पालशेतकर, बालरोगतज्ञ डॉ.सचदेव, रेडीओलॉजीस्ट डॉ.अजय जाधव हे मंडळावर सदस्य आहेत.  यासह पदसिध्द असलेल्या मान्यवरांसह २० जणांचे हे पर्यवेक्षक मंडळ आहे.  गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्वी गर्भलिंग जाणून घेण्यास आणि निवडण्यास गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायद्यान्वये (पीसीपीएनडीटी) प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

त्यावर  गर्भजल व गर्भलिंगनिदान तंत्र (नियमन व गैरवापर प्रतिबंध) कायदा, १९९४ या कायद्यात २००३ मध्ये सुधारणा करून त्याचे नवे नाव गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा,असे करण्यात आले आहे.  गर्भलिंगनिदान व गर्भनिवड करण्यास या कायद्याद्वारे मनाई करण्यात आली असुन गर्भाचे निदान करून तो गर्भ मुलीचा असल्यास गर्भपाताद्वारे तो काढून टाकण्याच्या अमानवी प्रकारावर वचक बसवण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.

महिलांच्या अत्यंत महत्वाच्या विषयासंदर्भातील प्रश्नासाठी वैशाली मोटे यांना निवडण्यात आल्याने त्यांना राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. माजी आमदार राहुल मोटे यांच्या वैशाली या पत्नी असुन त्या सक्रीय राजकारणात नसल्या तरी सामाजिक कामात कार्यरत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com