वैद्यनाथ कारखान्यात राष्ट्रवादीकडून धुडगूस, संचालक मंडळाचा आरोप

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मोठ्या परिश्रमाने शेतकरी हितासाठी कारखाना सुरु केला. मात्र, राष्ट्रवादीकडून चांगल्या कामात खिळ घातल्याचा आरोप वैद्यनाथ कारखान्याच्या संचालकांनी केला.
Parli suger Factory- Pankaja Munde News- beed
Parli suger Factory- Pankaja Munde News- beed

परळी वैजनाथ : शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक अडचणींवर मात करुन
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी मारामारी, गोंधळ करून अक्षरशः धुडगूस घातला. हा प्रकार म्हणजे चांगल्या प्रकारे सुरू असलेल्या कामात खिळ घालण्याचा तसेच शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप वैद्यनाथ कारखान्याच्या संचालकांनी केला आहे.

दिड वर्षाच्या पगारासाठी वैद्यनाथ कारखान्यातील कामगारांनी कारखाना बंद पाडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर संचालक मंडळाने या संदर्भात राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. शिवाजी गुट्टे, व्यंकट कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, हनुमंत नागरगोजे, माऊली साबळे, चंद्रकांत देवकते यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

कारखाना सुरु करण्यासाठी अनेक दिवसांचे नियोजन लागते. कोजन प्रकल्प व शुगर मिलला क्षणात दारुड्या लोकांनी बंद केल्याचा आरोप करत हे नुकसान आता कोणाचे? असा सवालही या पत्रकात करण्यात आला आहे.

वैद्यनाथ साखर कारखाना मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कर्मचाऱ्यांच्या बंद काळातील पगारी बाबत त्यांनी केलेल्या मागणीवर विचार सुरू होता. कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी नुकत्याच परळी दौर्‍यात याविषयी सकारात्मक भूमिका घेतली होती.

कारखान्याचे कार्यकारी संचालक औरंगाबादला गेल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी बुधवारी वजन काटा बंद केला व धुडगूस घालण्यास सुरवात केल्याचा आरोपही त्यांनी केला. कामावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली तसेच दादागिरी करून एकही कर्मचारी जागेवर ठेवला नाही. अशा परिस्थितीत परळी मध्ये चांगल्या राजकारणाला काय भविष्य राहील? असा सवाल देखील पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे.

पंकजा मुंडे यांनी कारखाना सुरू व्हावा म्हणून अथक परिश्रम घेतले. सरकारकडून कर्ज थकहमी मिळविली. या सर्व प्रयत्नानंतर गाळप हंगाम यशस्वरित्या सुरू झाला. त्यामुळे सर्वाना थोडी थोडी अडचण सहन करावी लागणार आहे. अशा आर्थिक संकटात सर्वांनी मिळून काम करण्याची अपेक्षा असताना दहशत माजवून चालू कामात खिळ घालण्याचा हा प्रकार आहे असेही पत्रकात म्हटले आहे.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com