अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुन बीडसाठी युरिया; प्रश्न मुंडेमुळे मार्गी? की धसांमुळे..

पुर्वी जिल्ह्यासाठी केवळ परळी रेल्वे ट्रॅकवरुन युरिया उपलब्ध केला जात होता. त्यामुळे जिल्ह्याच्या आष्टीसारख्या दुसऱ्या टोकापर्यंत वाहतूकीसाठी मोठी कसरत होती.
Beed Political News Suesh Dhas-Pritam Munde
Beed Political News Suesh Dhas-Pritam Munde

बीड : जिल्ह्यासाठी पुर्वी केवळ परळी रेल्वे ट्रॅकवरुन युरिया उपलब्ध होत होता. आता अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुनही युरिया उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या भागात युरिया पुर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर उपलब्ध होणार आहे. (Urea for beads from Ahmadnagar railway tracks; The question is whether it is due to Munde or due to Dhas) मात्र, अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरुन युरिया उपलब्ध होण्याचा प्रश्न भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यामुळे सुटला कि भाजपचेच आमदार सुरेश धस यांच्यामुळे मार्गी लागला, असा नवा प्रश्न या निमित्ताने उपस्थीत होत आहे.

जिल्ह्यात सर्वच खतांची आयात होते. यात विशेषत: युरियाची आयात रेल्वेने होते. पुर्वीपासून परळीच्या ट्रॅकवरुन युरिया उपलब्ध होत असे. त्यामुळे इकडे बीड, आष्टी, पाटोदा, शिरुर कासार या दुरवरच्या भागाला वाहतूकीचा भुर्दंड बसत होता. (Bjp Mp Dr. Pritam Munde) आता अहमदनगरच्या रेल्वे ट्रॅकवरुनही युरिया उपलब्ध होणार आहे. या ट्रॅकवरुन १२०० मेट्रीक टन युरिया उपलब्ध देखील झाला.

दरम्यान, खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी पुणे येथील कृषी आयुक्तांना पत्र लिहून अहमदनगर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या बीड जिल्ह्यातील तालुक्यासांठी खत उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या होत्या. (Bjp Mla Suresh Dhas) यानुसार नगर रेल्वे ट्रॅकवरुन बीड जिल्ह्यासाठी १२०० मेट्रीक टन खत उपलब्ध झाल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. यामुळे या भागातील खत विक्रेत्यांना सोयीचे झाले आहे. 

दोघांच्याही समर्थकांकडून दावे

तर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आले असता भाजप आमदार सुरेश धस यांनी हा प्रश्न त्यांच्या कानी घातला. पवारांनी तत्काळ दखल घेऊन हा मुद्दा मार्गिही लावला असे खुद्द सुरेश धस यांनी बैठकीनंतर सांगितले. त्यांच्या समर्थकांनीही अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरून युरिया उपलब्ध होण्याचा प्रश्न सुरेश धस यांच्यामुळे मार्गी लागला अशा पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल केल्या आहेत.

धसांनी प्रश्न मांडला आणि पवारांनी सोडविला असेही त्यांचे म्हणणे असतानाच आता खासदार मुंडे यांच्या कार्यालयाकडून देखील त्यांनीच हा प्रश्न सोडविला असे सांगितले जात आहे. त्यामुळे अहमदनगर रेल्वे ट्रॅकवरून जिल्ह्यासाठी युरिया मिळण्याचा प्रश्न निकाली लागला असला तरी तो नेमका खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यामुळे की आमदार सुरेश धस यांच्यामुळे या श्रेयाची स्पर्धा त्यांच्या समर्थकांमध्ये रंगली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com