केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कार्यकर्त्याच्या भूमिकेत..

सगळ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाल्याची खात्री पटल्यावर मगच दानवे आणि भाजपच्या इतर नेत्यांनी महाराष्ट्र सदन सोडले.
Minister raosaheb danve  news Dehli
Minister raosaheb danve news Dehli

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी सध्या दिल्लीत त्यांचे समर्थक गर्दी करत आहेत. त्यामुळे दिल्लीतील दानवे यांचे कार्यालय, बंगला गर्दीने गजबजून गेला आहे. महाराष्ट्रासह त्यांच्या मतदारसंघातूनही बरेच लोक दिल्लीत त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. (Union Minister of State for Railways Raosaheb Danve in the role of activist) दानवे हे देखील त्यांच्या स्वागताचा स्वीकार करत त्यांचे आभार व्यक्त करतांना दिसत आहेत.

पण हजारो किलोमीटर लांबवरून शुभेच्छा द्यायला दिल्लीत आलेल्या एखाद्या कार्यकर्त्याची किंवा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत असेल तर ती दूर करण्यात रावसाहेब दानवे किती तत्पर असतात याचा अनुभव काल आला. ( Central State Railway Minister Raosaheb Danve, Dehli) दिल्लीत आलेल्या कार्यकर्त्यांची राहयाची सोय नसल्याचे समजताच मंत्रीपदाचा बडेजाव न दाखवता रावसाहेब दानवे बंगल्यावरून निघून थेट महाराष्ट्र सदनात पोहचले.

तिथे राखीव कोट्यातून तसेच सहकारी मंत्र्यांच्या ओळखपत्राचा आधार घेत त्यांनी वीस पेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था करून दिली. ( Central State Minister Dr. Bhgwat Karad) जोपर्यंत त्यांची व्यवस्था झाल्याची खात्री पटत नाही, तोपर्यंत दानवे महाराष्ट्र सदनाच्या बाहेर पडले नाही. (Maharashtra Sadan, Dehli)कार्यकर्त्यांसाठी मंत्री असलेले दानवे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या भूमिकेत गेल्याचे या निमित्ताने पहायला मिळाले. दानवे यांच्या या साधेपणा आणि कार्यकर्त्यांबद्दलची आपुलकी दिल्लीतही चर्चेचा विषय ठरली आहे.

नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात रावसाहेब दानवे यांच्याकचे रेल्वे, कोळसा व खाण मंत्रालायचे राज्यमंत्री म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे. रेल्वे सारखे महत्वाचे खाते मिळाल्यामुळे दानवे यांचे दिल्लीतील वजन वाढले आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्यावेळी अनेक बड्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. पण रावसाहेब दानवे यांचे मंत्रीपद कायम राहिले, उलट त्यांच्यावर रेल्वे सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली.

त्यामुळे सहाजिकच महाराष्ट्र विशेषतः त्यांच्या जालना-भोकरदन मतदारसंघातील समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण ठरला. दानवे यांच्या शपथविधीला प्रत्येकाला जाणे शक्य नव्हते, त्यामुळे मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीत जाऊन त्यांना भेटणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असेच १४ रोजी महाराष्ट्र व जालना-भोकरदनमधून दोनशेहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पुण्यातून नगरसेवक अमोल बालवाडकर, किरण दगडे हे देखील दानवे यांना मंत्रीपदाच्या शुभेच्छा देण्यासाठी काल दिल्लीत दाखल झाले होते.

सकाळी मंत्रालयात दानवे यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केल्यानंतर कार्यकर्ते दिल्लीतच मुक्कामी थांबणार होते. त्यांच्या निवासाची व्यवस्था दानवे यांनी केली होती. परंतु दोनशे पैकी वीस एक कार्यकर्त्यांना कुठेच खोल्या मिळत नव्हत्या. खाजगी हाॅटेल्समध्येही विचारणा झाली पण तिथेही त्या उपलब्ध नव्हत्या. वीस कार्यकर्त्यांची राहण्याची सोय होत नसल्याची माहिती दानवे यांना जेव्हा मिळाली, तेव्हा त्यांनी बंगल्यावरून निघत थेट महाराष्ट्र सदन गाठले.

कराड, पाटील, रावलही आले..

तिथे या कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. दानवे यांनी स्वतः स्वागत कक्षावर जात चौकशी केली, विशेष कोट्यातून काही खोल्या उपलब्ध करून दिल्या. त्यांनतरही काही कार्यकर्त्यांचा प्रश्न होताच. मग महाराष्ट्र सदनात आणखी कोण आलेले आहेत याची माहिती घेतली, तेव्हा भाजपचे महाराष्ट्रातील नेते हर्वर्धन पाटील, माजी मंत्री जयकुमार रावल हे काही काम निमित्त तिथे आल्याचे त्यांना समजले. दानवे यांनी तात्काळ त्यांना फोन लावून त्यांचे ओळखपत्र घेऊन स्वागत कक्षात बोलावले.

त्यांच्या ओळखपत्रावर काही खोल्या उपलब्ध करून घेतल्या. तेवढ्यावरही भागत नाही म्हटल्यावर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या ओळखपत्रावरही काही खोल्या घेतल्या. सगळ्या वीस कार्यकर्त्यांच्या राहण्याची व्यवस्था नव्या आणि जुन्या महाराष्ट्र सदनात केली. पाटील, कराड आणि रावल हे देखील दानवे यांच्यासोबतच होते.

सगळ्या कार्यकर्त्यांच्या राहण्याची व्यवस्था झाल्याची खात्री पटल्यावर मगच दानवे आणि भाजपच्या इतर नेत्यांनी महाराष्ट्र सदन सोडले. दानवे यांनी कार्यकर्त्यांसाठी केलेली धावपळ पाहून अनेकांना मंत्रीपदाचा बडेजाव न करता ते सामान्य कार्यकर्त्यांच्या भूमिकेत शिरल्याचे म्हटले. रावसाहेब दानवे यांच्या या साधेपणाचे दिल्लीत आणि महाराष्ट्रातही कौतुक होत आहे.  

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com