केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. कराड यांनी मार्ग बदलला... आता परळीतूनच 'जनआशिर्वाद यात्रा`..

पाच जिल्ह्यातील ३२ ठिकाणावरून ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. कराड यांनी मार्ग बदलला... आता परळीतूनच 'जनआशिर्वाद यात्रा`..
Karad-Munde-Parli-Jan Ashirwad Rally News Aurangabad

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात काढण्यात येणाऱ्या जन आशिर्वाद यात्रे संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होत्या. (Union Minister of State Dr. karad start 'Jana Arshirwad' Yatra from Parli) अखेर त्या सगळ्या खोट्या ठरवत कराड आपल्या जनआशिर्वाद यात्रेला परळीतून सुरूवात करणार आहे.

भाजपच्या वतीने मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील यात्रेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ( Bjps Jan Ashirwad Rally In Marathwada) राज्यातून केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळालेल्या चार मंत्र्यातर्फे त्यांच्या विभागातील पाच मतदारसंघात सोमवारपासून(ता.१६) जनआशिर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. मराठवाड्यातील जनआशिर्वाद यात्रा ही परळीपासून सुरु होणार आहे.

२१ ऑगस्टला औरंगाबादेत यात्रेचा समारोप होईल. पाच जिल्ह्यातील ३२ ठिकाणावरून ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे. (Central State Fianance Minister Dr.Bhagwat Karad)  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली ही जनआशिर्वाद यात्रा परळी येथून सोमवारी (ता.१६) सकाळी ८ वाजता सुरू होईल.

त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन डाॅ. कराड हे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर ही यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी ही यात्रा गंगाखेड, पालम, लोहा येथून नांदेड येथे जाणार आहे. मंगळवारी (ता.१७) नांदेड येथे सकाळी ९ वाजात पोहचल्यानंतर  तेथून अर्धापूर, कळमनूरी मार्गे येथे हिंगोली मुक्कामीअसेल.  

बुधवार (ता.१८) हिंगोली, जिंतूरहुन परभणी येथे या जन आशिर्वाद यात्रेचा मुक्काम होईल. गुरुवारी (ता.१९) परभणी, मानवत, पार्थी, सेलू, परतूर, वाटुर, शुक्रवारी (ता.२०) जालना, बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा मार्गे यात्रेचे आगमन औरंगाबादेत होणार आहे.  यासह शनिवारी (ता.२१)   औरंगाबाद,दौलताबाद, खुलताबाद, वेरुळ, हतनुर आणि कन्नड येथे जन आशिर्वाद यात्रेचा समारोप होईल.

Edited By :  Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in