`गोपीनाथगडावर नतमस्तक होणार, तिथेच पंकजांच्या हस्ते पहिला सत्कार!`

पंकजाताई या देखील गंगाखेडपर्यंत यात्रेत सहभागी होतील. त्यानंतर पुढील प्रवासासाठी यात्रा मार्गस्थ होईल.
`गोपीनाथगडावर नतमस्तक होणार, तिथेच पंकजांच्या हस्ते पहिला सत्कार!`
Pankja-bhagwat karad

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस यांच्याकडून आम्हा सगळ्या मंत्र्यांना १६ आॅगस्टपासून पाच लोकसभा मतदारसंघाxत जनआशिर्वाद यात्रा काढण्यासंदर्भात पत्र मिळाले आहे. दिल्लीहून मी थेट हैदराबाद आणि तिथून नांदेडला जाणार आहे. जन शिर्वाद यात्रेचा शुभारंभ करण्याआधी मी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून तिथे नतमस्तक होणार आहे. (Bhagwat Karad will visit Gopinathgarh first) त्यांनतर गोपीनाथगडावरच माझा पहिला सत्कार पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते स्वीकारणार असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी `सरकारनामा`,शी बोलतांना सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने देशभरात जन आशिर्वाद यात्रा काढण्यात येणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर १६ आॅगस्टपासून ही जन आशिर्वाद यात्रा निघणार आहे. (Central State Finance Minister Dr. Bhagwat Karad) मराठवाड्यात अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली पाच लोकसभा मतदारसंघात यात्रा काढून संवाद साधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर डाॅ. भागवत कराड हे हैदराबादहून नांदेड आणि तिथून मोटारीने थेट गोपीनाथगडावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत.

यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार असून कराड यांचा पहिला सत्कार देखील त्यांच्याच हस्ते केला जाणार असल्याचेही कराड यांनी सांगितले. (Bjp Leader Pankaja Munde, Beed) जनआशिर्वाद यात्रेची रुपरेषा आणि कार्यक्रमा संदर्भात बोलतांना डाॅ. कराड म्हणाले, या यात्रेच्या माध्मातून केंद्रातील मोदी सरकारने देशभरात केलेली विकासकामे, जनतेच्या हिताच्या राबवलेल्या योजना, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वच घटकांसाठी घेण्यात आलेले निर्णय याची माहिती तळागाळापर्यंत पोहचवणे हा प्रमुख उद्देश आहे.

पंकजा मुंडेही सहभागी होणार..

प्रत्येक मंत्र्याला पाच लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. या सगळ्या कार्यक्रमाची आखणी ही राष्ट्रीय अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्याकडून केली जात आहे. मराठवाड्यातील यात्रा ही माझ्या नेतृत्वाखाली होणार आहे. या यात्रेसाठी मनोज पांगरकर यांनी यात्राप्रमुख म्हणून तर आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केनेकर यांची सहसंपर्कप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अधिवेशन संपल्यानंतर कुठलाच मंत्री हा आपल्या घरी किंवा मतदारसंघात न जाता थेट त्याच्यावर सोपवलेल्या पाच लोकसभा मतदारसंघात जाणार आहे. त्यामुळे मी औरंगाबादला न येता हैदराबाद मार्गे थेट नांदेडला जाईन.

नांदेड जिल्ह्यातून यात्रेला सुरूवात होणार असली तरी मी नांदेडहून आधी गोपीनाथगडावर जाणार आहे. तिथे गोपीनाथ मुंडे साहेंबाच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करणार, त्यांचे आशिर्वाद घेणार. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस पंकजाताई मुंडे या देखील उपस्थित असणार आहेत. स्मृतीस्थळाला अभिवादन केल्यानंतर मंत्री झाल्याबद्दलचा पहिला सत्कार हा गोपीनाथ गडावरच पंकजाताईंच्या हस्ते स्वीकारणार आहे. तिथूनच पुढे गंगाखेड मार्गे नांदेड जिल्ह्यातून जन आशिर्वाद यात्रेला प्रारंभ होईल. पंकजाताई या देखील गंगाखेड पर्यंत यात्रेत सहभागी होतील. त्यानंतर पुढील प्रवासासाठी यात्रा मार्गस्थ होईल, असेही डाॅ.कराड यांनी स्पष्ट केले. 

बीडलाही जाणार..

जनआशिर्वाद यात्रेतून बीडला वगळले अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, या विषयी विचारले असता, कराड यांनी या चर्चा चुकीच्या असल्याचे सांगितले. पाच लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्यानूसार नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या पाच जिल्ह्यातून जात असतांना इतर काही मतदारसंघ देखील यात घेतले जातील, अशी रचना करण्यात आली आहे. हे पाच जिल्हे झाल्यानंतर मी लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही जाणार  असल्याचे कराड यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in