काकांची सत्ता असलेल्या नगरपालिकेच्या चौकशीची पुतण्याकडून मागणी

चोवीस महिन्याच्या कालवधीत ही योजना पुर्ण करायची होती. ही मुदत संपून गेली तरी नगरपालिकेला एचटीपी आणि वाॅटरप्लाॅंट उभारता आला नाही.
Ncp Mla Sanip Kshirsagar- Beed Nagar Palika-Politcal News
Ncp Mla Sanip Kshirsagar- Beed Nagar Palika-Politcal News

औरंगाबाद: बीड जिल्ह्याच्या राजकारणात काका जयदत्त, भारतभूषण क्षीरसागर आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. संधी मिळेले तेव्हा हे काका-पुतणे एकमेकांवर कुरघोडी करत असतात. बीड नगरपालिकेने अमृत अटल योजनेअंतर्गत होणाऱ्या भूमित गटार आणि पाणी योजनेसाठी खोटा डीपीआर दिल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी आज विधानसभेत केला.

या योजनेसाठीच्या अटी नगरपालिकेने पुर्ण न केल्यामुळे योजना रखडली असून अडीचशे ते तीनशे कोटींचा निधी पडून असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची चौकशी लावा, अशी मागणी करत संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा काकांवर कुरघोडी केली.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यावर चर्चा करतांना बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका नगराध्यक्ष असलेल्या नगरपालिकेतील गैरव्यवहारच सभागृहात मांडला. चुकीचा डीपीआर, सर्व्हे, नगरपालिकेची स्वःताची जागा नसतांना ग्रामपंचायतीची जागा आपली दाखवून खोटी माहिती दिल्याचा आरोप क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात केला.

संदीप क्षीरसागर म्हणाले, बीड शहरासाठी अमृत अटल योजनेअंतर्गत भूमीगत गटार आणि पाणी योजना मंजुर झाली आहे. २४ महिन्यांत ही योजना पुर्ण करायची होती. पण योजनेसाठीच्या अटी व निकषाचे पालन न करता खोटी माहिती देऊन नगरपालिकेने दिशाभूल केल्यामुळे ही योजना रखडली आहे.

गटार योजनेसाठी १६५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. पण या योजनेसाठी जो डीपीआर नगरपालिकेने शासनाकडे सादर केला तो खोटा होता, असा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला. ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नगरपालिकेची दाखवण्यात आली.

भुमिगत गटार योजेनेचे काम सुरू करण्यापुर्वी एचटीपी आणि वाॅटर प्लाॅंट तयार असला पाहिजे ही या योजनेतील प्रमुख अट होती. चोवीस महिन्याच्या कालवधीत ही योजना पुर्ण करायची होती. ही मुदत संपून गेली तरी नगरपालिकेला एचटीपी आणि वाॅटरप्लाॅंट उभारता आला नाही. त्यामुळे अमृत योजनेतून शहरात २९ हजार नळ कनेक्शन देण्याचे काम रखडले आणि त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.

निधी पडून, योजना रखडली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची देखील नगरपालिकेने फसवणूक केली. पहिल्या टप्प्यातील कामच अजून झालेले नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे देखील रखडले आहे. त्यामुळे या योजनेचा अडीचशे ते तीनशे कोटींचा निधी नगरपालिकेकडे पडून आहेत. या योजनेच्या दिरंगाईला आणि खोटी माहिती देऊन प्राधिकरणाची दिशाभूल करण्याला जे जबाबदार आहेत, त्यांची चौकशी लावा, अशी मागणी देखील क्षीरसागर यांनी यावेळी केली.

२०१४-१५ मध्ये शहरात व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी मच्छी मार्केट आणि भाजी मार्केटसाठी इमारती बांधण्यात आल्या होत्या. पण अजून त्या शेतकरी, व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याचा आरोपही त्यांनी केला. माझ्या मतदारसंघात चारशे प्राथमिक शाळा आहेत. यातील बऱ्याच शाळांची पडझड झाली आहे, जिल्हा परिषदेने या संदर्भात पत्र देखील दिले आहे. त्यामुळे या जुन्या शाळांची डागडुजी आणि काही नव्या शाळा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील संदीप क्षीरसागर यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com