पुढची साडेतीन वर्ष आणि भविष्यातही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री..

जालना नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आमची रणनिती तयार झाली असून आठ महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकीत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.
Jalna Political News- Abdul Sattar
Jalna Political News- Abdul Sattar

जालना : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील स्पष्ट केले आहे, की उद्धव ठाकरे हेच आघाडी सरकारमध्ये संपुर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील. (Uddhav Thackeray will be the next Chief Minister for the next three and a half years: Abdul Sattar) दीड वर्ष झाले आहे, पुढील साडेतीन वर्ष देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच राहतील, भविष्यात देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व निवडणुका स्वबळावर लढणवण्याची घोषणा करत मुख्यमंत्री देखील काॅंग्रेसचा होईल, असे म्हटले आहे, त्यासाठी आधी त्यांनी आवश्यक संख्याबळ निवडून आणावे, असा टोला देखील सत्तार यांनी यावेळी लगावला. (State Minsiter Abdul Sattar) जालना येथे आगामी नगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने संघटनात्मक बैठकीसाठी सत्तार आले होते.

माजी मंत्री अर्जून खोतकर, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीनंतर सत्तार प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Shivsena Leader Arjun Khotkar) यावेळी त्यांनी काॅंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या महत्वाकांक्षेवर भाष्य केले. (CM Udhhav Thackeray) सत्तार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये ठरल्याप्रमाणे संपुर्ण पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार आहे. (Congress State President Nana Patole) भविष्यात देखील ज्या निवडणुका होतील, त्यामध्ये शिवसेना हा एकनंबरचा पक्ष राहणार आहे. त्यामुळे भविष्यात देखील उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील.

काॅंग्रेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदा बद्दलची महत्वाकांक्षा जाहीर केली असली तरी त्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ निवडून येणे आवश्यक असते, ते त्यांना आणावे आणि जरूर आपला मुख्यमंत्री करावा. तुर्तास उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. त्यानंतर आम्ही एकत्रित लढल्यानंतर देखील भविष्यात शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा दावा देखील सत्तार यांनी केला.

महापालिकेचा प्रस्ताव आल्यास विचार करू..

जालना नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आमची रणनिती तयार झाली असून आठ महिन्यांनी होणाऱ्या या निवडणुकीत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काॅंग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे, तर आमची देखील स्वबळाची तयारी आहे. जालना जिल्ह्यातील येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढू, त्याशिवाय भगवा फडकणार नाही, असेही सत्तार म्हणाले.

जालना शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता इथे महापालिका व्हावी, अशी मागणी माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव अजून शासनाकडे आलेला नाही. परंतु तो जेव्हा येईल, तेव्हा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या संदर्भातील योग्य निर्णय घेतली, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com