संपर्क कार्यालयाच्या झाडाझडतीने दानवे संतापले; दोन पोलिस उपनिरीक्षक, तीन कर्मचारी निलंबित..

कायदेशीर अधिकार, आदेश नसतांना कार्यालयात शिरून झाडाझडती घेतली. कार्यालयीन संचिका व इतर साहित्याची नासधुस केली.
Bjp Minister Raoshaeb Danve News Jalna
Bjp Minister Raoshaeb Danve News Jalna

जालना ः अवैध वाळू उपशाची बातमी प्रसिध्द करणाऱ्या एका पत्रकारास जाफ्राबाद येथे मारहाण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींवर गुन्हा दाखल केला. (Two police sub-inspectors and three employees suspended for raiding Raosaheb Danve's liaison office.) या प्रकरणातील संशयित आरोपी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयात लपून बसल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कुठल्याही परवानगी शिवाय झाडाझडती घेतली. तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करून सामान अस्ताव्यस्त फेकले. या प्रकरणी रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून पोलिस अधिक्षक विनायक देशमुख यांनी दोन पोलिस उपनिरिक्षकांसह तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

या कारवाईने पोलिस विभागाचे धाबे दणाणले असून दोन्हीकडून पोलिसांनाच मार अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अवैध वाळू उपशाची बातमी देणाऱ्या पत्रकारास तीन दिवसांपुर्वी जाफ्राबाद येथे लाठाकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली होती. (Centra State Minister Raosaheb Danve) पोलिस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने संशियत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींना अटक करण्यासाठी जाफ्राबाद पोलिसांवर वरिष्ठांचा दबाव होता. (PSI And Constable Supended) मात्र आरोपींचा शोध घेतांना दानवे यांच्या संपर्क कार्यालायची झाडाझडती घेणे जाफ्राबाद पोलिसांच्या आता अंगलट आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल , पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस हेड कॉन्सटेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके,  सचिन उत्तमराव तिडके व शाबान जलाल तडवी यांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधिक्षकांनी काढले आहेत. (Police Suprntednt Vinayak Deshmukh) ११ जून रोजी या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसतांना सदर पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीपरणे दानवे यांच्या संपर्क कार्यालयाची झडती घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दोन दिवसांत झटपट कारवाई..

यामुळे पोलीस खात्याची जनसामन्यात प्रतिमा मलीन झाली असून कायद्याचे पूर्ण ज्ञान असताना देखील कर्तव्यात बेकायदेशीर व अत्यंत बेशिस्तपणाचे वर्तन केले म्हणून ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधिक्षकांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. या बाबत रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  ११ जून रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास माझ्या चिखली रोडवरील जनसंपर्क कार्यालयात कार्यालय प्रमुख उध्दव दुनगहू,  नागेश धुपे, अंबादास जाधव हे कामकाज करत होते.

त्याच वेळी जाफ्राबाद पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरिक्षक युवराज पोटरे, पोलिस उपनिरिक्षक नितीन काकरवाल, पोलिस कॉन्सटेबल शाबान तडवी, जाफ्राबादचे बीट जमादार मंगलसिंग सोळंके व पोलिस कॉन्सटेबल सचिन तिडके या सहा पोलिस कर्मचाऱ्यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार, आदेश नसतांना कार्यालयात शिरून झाडाझडती घेतली. कार्यालयीन संचिका व इतर साहित्याची नासधुस केली तसेच त्यातील काही संचिका व निवडणुक व मतदारसंघातील विविध विकास कामांचा डेटा जबरदस्तीने सोबत नेला.

झाडाझडती सुरू असतांना कार्यालय प्रमुख उध्दव दुनगहू यांनी झाडाझडती घेण्यासाठी आपल्याकडे रितसर आदेश आहेत का? अशी पोलिस उपनिरिक्षक युवराज पोटरे यांच्याकडे विचारणा केली.  त्यावेळी त्यांनी दुनगहू यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली व पाऊण तास कार्यालयात गोंधळ घातला. सदर बेकायदेशीर झाडाझडती घेत असतांना त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या संचिका व इतर साहित्याची नासधुस करुन त्यातील काही महत्वाच्या संचिका, लोकसभा निवडणुक व मतदारसंघातील विविध विकास कामांचा डेटा आणि जनेतेने दिलेली निवेदने सोबत नेली.

झाडाझडतीतून निष्पन्न काय झाले?

एका संसदीय लोकप्रतिनिधी व विद्यमान केंद्रिय राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची कुठलेही कायद्देशीर आदेश न घेता झाडाझडती घेणे व ती घेत असतांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करणे  ही बाब संपूर्णतः बेकायदेशीर व संसदीय लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्था व लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे.  सदर पोलिस कर्मचाऱ्यांनी कुठल्या कारणाने कोणतेही कायदेशीर आदेश न घेता माझ्या कार्यालयाची झडती घेतली?  त्यातुन काय निष्पन्न झाले याचा पोलिस खात्याने तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी देखील रावसाहेब दानवे यांनी पोलीस अधिक्षकांकडे पत्राद्वारे केली.

कायदेशीर अधिकार नसतांना माझ्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतल्यामुळे माझी बदनामी झाली, जनमाणसातील प्रतिमा मलिन करण्यासाठी हेतुपुरस्सर ही झाडाझडती केली.  यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा म्हणुन सदर प्रकरणाची चौकशी करुन उपरोक्त सर्व पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती.  

दरम्यान, पोलिसांवरील या कारवाईनंतर वेगवेळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिसांनी रावसाहेब दानवे यांच्या संपर्क कार्यालयाचीच झाडाझडती का घेतली? पत्रकाराला मारहाण करणाऱ्या आरोपींचा भाजपशी काही संबंध आहे?. भाजयुमोच्या कार्यकर्त्याला जालना पोलिसांकडून अमानुष मारहाण झाली तेव्हा गप्प असलेल्या दानवेंनी कार्यालयाची झाडाझडती होताच, थेट त्यांना निलंबन करण्याची मागणी का केली? पोलिस अधिक्षकांवर दानवे यांनी कारवाईसाठी दबाव आणला, म्हणून दोनच दिवसांत संबंधित पोलिसांचे निलंबन करून त्यांचा बळी देण्यात आला का? असे प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com