दोन लाखांच्या लाचप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी अटकेत

अँट्रॉसिटीच्याप्रकरणात संबंधितावरील कारवाई टाळण्यासाठीखिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती.
दोन लाखांच्या लाचप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी अटकेत
Jalna Acb Raid News

जालना ः अॅट्रॅासिटी प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी संबंधितांकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या व त्यापैकी दोन लाख घेतल्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने जालन्यात धडक कारवाई केली आहे. (Two employees, including a sub-divisional police officer, arrested in a Rs 2 lakh bribery case) या लाच प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह अन्य दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

लालूचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने आज जालना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चांगलेच हादरले. (The team from Pune and Aurangabad jointly carried out the operation.) उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्यासह अन्य दोन पोलिस कर्मचारी अॅन्ट्रीकरप्शनच्या जाळ्यात सापडले. पुणे आणि औंरंगाबादच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.

पोलिसांत दाखल झालेल्या अँट्रॉसिटीच्या प्रकरणात संबंधितावरील कारवाई टाळण्यासाठी खिरडकर यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले. (Khiradkar and two other policemen had demanded a bribe of Rs 5 lakh.) परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती.

त्यानंतर पुणे व औरंगाबादच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सापळा रचून आज तीन लाखांपैकी दोन लाखांची रक्कम स्वीकारतांना उपविभागीय अधिकारी खिरडकर यांच्यासह विठ्ठल खर्डे, सत्यनारायण अंभोरे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in