गोयल प्रकरणात ट्विस्ट; बदली रोखण्यात शिवेसना खासदाराचा हात असल्याची चर्चा..

परभणी जिल्ह्याला कधीच चांगले, प्रामाणिक अधिकारी मिळू दिले जात नाही, असा आरोप करत आता सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.
गोयल प्रकरणात ट्विस्ट; बदली रोखण्यात शिवेसना खासदाराचा हात असल्याची चर्चा..
Parbhani Collector return without Charge-Mp Jadhav News

परभणी ः आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर त्या पदभार घेण्यासाठी दाखल झाल्या. सहा दिवस त्या थांबून होत्या, पण त्यांना पदभार देण्यात आला नाही, आणि अचानक त्यांना मुंबईत परत बोलवण्यात आले. या घटनाक्रमामुळे परभणीकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले, सोशल मिडियाच्या माध्यमातून या संदर्भात तिखट प्रतिक्रिया उमटायला लागल्या. (Twist in the Goyal case; Shiv Sena MP's hand in preventing transfer) असे असतांनाच आता आंचल यांना परभणीत येण्यापासून रोखण्या मागे जिल्ह्याचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा हात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

जाधव यांनीच मुंबईत दोन दिवस तळ ठोकून गोयल यांची बदली रद्द केल्याचे बोलले जाते. जाधव यांनी या प्रकरणावर अद्याप कुठलेही भाष्य केले नसले तरी संशयाची सुई त्यांच्या दिशेने जात असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Shivsena Mp Sanjay Jadhav Parbhani) आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय नेत्यांचा होणारा हस्तक्षेप या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

भाजप, राष्ट्रवादीने या राजकीय हस्तक्षेपाचा निषेध नोंदवला आहे, तर परभणीतील काही सामाजिक संघटना देखील गोयल यांच्यासाठी रस्त्यावर उतल्या आहेत. त्यामुळे हे बदली प्रकरण चांगलेच तापण्याची आणि त्यावरून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये खटके उडण्याची शक्यतात देखील वर्तवली जात आहे. (Chief Minister Uddhav Thackeray, Maharashtra) परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे ३१ जूलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी असलेल्या आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

कनिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार कुणाच्या आदेशाने..

त्या पदभार स्वीकारण्यासाठी परभणीत दाखल देखील झाल्या. सहा दिवस पदभार घेण्यासाठी त्या प्रतिक्षा करत असतांना मुगळीकर यांनी तो त्यांच्याकडे न सोपवता कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवला. तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती, कारण वरिष्ठांच्या आदेशाशिवाय मुगळीकर असा निर्णय घेऊ शकत नाहीत. आता दोन दिवसांनी या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून गोयल यांना पदभार घेता येऊ नये, यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आपले राजकीय वजन वापरल्याची जोरदार चर्चा आहे.

गोयल यांना परभणीत येण्यापासून रोखण्यासाठी जाधव यांनी दोन दिवस मुंबईत ठाण मांडले होते. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याने गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून झालेली नियुक्ती जाधव यांनी रद्द करवून घेतल्याचे बोलले जाते.

परभणी जिल्ह्याला कधीच चांगले, प्रामाणिक अधिकारी मिळू दिले जात नाही, असा आरोप करत आता सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी खासदार जाधव यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. एकंदरित गोयल बदली प्रकरण चागंलेच तापणार असे दिसते. 

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in