जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ट्विस्ट, राष्ट्रवादीचे आमदार दुर्राणी, भाजपच्या गोटात..

बाबजानी दुर्राणी यांनी स्वतःच्या राजकारणाची झलक दाखवून वरपूडकर गटाला धक्का दिला आहे
Parbhani District Bank- Bordikar-warpudkar-Durani News
Parbhani District Bank- Bordikar-warpudkar-Durani News

परभणी ः राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी हे भाजपच्या गोटात सामील झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीच्या पाथरी येथील भाजपच्या प्रचार सभेत बाबाजानी दुर्राणी यांची उपस्थिती वरपुडकर गटाला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुर्राणी हे बोर्डीकर गटात गेल्याने जिल्हा बॅक निवडणुकीत बोर्डीकरांचे पारडे जड मानले जात आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेवर गेल्या अनेक वर्षांपासून वरपूडकर- बोर्डीकर गटाचे सातत्याने वर्चस्व राहिले आहे. जिल्हा बँक या दोन बड्या नेत्याच्या राजकारणा पलीकडे कधी गेलीच नाही. या दोन्ही नेत्याचे कुरघोडीचे राजकारण अवघ्या सहकार क्षेत्रातील जाणकारांना बुचकळ्यात टाकणारे असते.

परंतु यंदा या निवडणुकीत बाबजानी दुर्राणी यांनी स्वतःच्या राजकारणाची झलक दाखवून वरपूडकर गटाला धक्का दिला आहे. याचे कारण शोधण्यासाठी जिल्ह्यातील राजकारणाच्या भूतकाळातील घटनांमध्ये डोकावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्या सोबत बाबाजानी यांचा झालेला वाद या घटनेमुळे परत एकदा चर्चेत आला आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत बोर्डीकर विरुध्द वरपुडकर हे दोन गट सक्रीय झाले आहेत. याआधी बोर्डीकर गटाचे चार तर वरपुडकर गटाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडुण आले आहेत. वरपुडकर गटात आमदार बाबाजानी दुर्राणी व बॅकेचे विद्यमान अध्यक्ष पंडीतराव चोखट यांचा समावेश आहे.

काॅंग्रेसच्या वरपुडकरांना धक्का

परंतू रविवारी भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ पाथरी तालुक्यात आयोजित एका प्रचार सभेत भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर, भावना बोर्डीकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन दिवसापूर्वीच आमदार बाबाजानी दुर्राणी हे बोर्डीकर गटाकडे झुकत असल्याची चर्चा  होती.

त्यात आज झालेल्या प्रचार सभेत आमदार दुर्राणी यांची उपस्थिती ही चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी हे बोर्डीकर गटात गेल्याने जिल्हा बॅक निवडणुकीत बोर्डीकर गटाचे वर्चस्व वाढले असून काॅंग्रेसच्या बोर्डीकरांना हा धक्का असल्याची चर्चा रंगत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com