वेळकाढूपणा चालणार नाही, कोरोना हाताबाहेर गेला तर परिणाम भोगावे लागतील...

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला पहिल्या पाच दिवसांत योग्य उपचार मिळाले तर तो रुग्ण तातडीने कोरोना मुक्त होऊ शकतो. खासगी ड़ॉक्टरांनी देखील त्यांच्या रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णासाठी आरक्षित कराव्या लागणार आहेत याची मानसिकता तयार करून ठेवावी.
sunil kendrekar news parbhani
sunil kendrekar news parbhani

परभणीः जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गांची स्थिती भयानक बनली आहे. अशावेळी वेळकाढूपणा चालणार नाही, केवळ सांधू-संतासारखे हो ला हो करू नका. गाभीर्याने घ्या, कोरोना हाताबाहेर गेला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसह इतर अधिकाऱ्यांना इशारा दिला. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रकरांनी नुकतीच परभणीला भेट देऊन जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. 

कोरोना विषाणु संसर्ग व उपाययोजना संदर्भात आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिकेचे आयुक्त पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह शहरातील डॉक्टर व पत्रकारांची यावेळी उपस्थिती होती.

केंद्रेकर म्हणाले, कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे असतात. त्यामुळे या पाच दिवसात डॉक्टरांनी रुग्णांचे मनोबल वाढविण्याबरोबरच इतर उपचार तातडीने करावेत. यात कुठेही दुर्लक्ष करता कामा नये. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन त्यांच्या बाजूने पूर्णपणे सहकार्य करत असतांना आरोग्य यंत्रणेने देखील तितक्याच वेगाने व लक्षपू्र्वक काम करावे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला पहिल्या पाच दिवसांत योग्य उपचार मिळाले तर तो रुग्ण तातडीने कोरोना मुक्त होऊ शकतो. खासगी ड़ॉक्टरांनी देखील त्यांच्या रुग्णालयातील खाटा कोरोना रुग्णासाठी आरक्षित कराव्या लागणार आहेत याची मानसिकता तयार करून ठेवावी.

या रुग्णाची लुट होणार नाही याची देखील दक्षता घेतली गेली पाहिजे. कोरोना कक्षात भरती असलेल्या रुग्णांना मानसिक आधार द्यावा, नातेवाईक रुग्णांत संवाद रहावा, यासाठी कोरोना कक्षाच्या बाहेर स्क्रिन लावून अधून मधून रुग्णांचे नातेवाईकांशी बोलणे करून द्यावे, असेही केंद्रकरांनी बैठकीत सांगितले.  कंटेन्टमेट झोनमधील रहिवाशी जर इतरत्र फिरत असतील तर त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. 

Edited By: Jagdish Pansare


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com