तीस हजार लिटर ऑक्सिजन,दोनशे अतिरिक्त बेड; इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मानले आभार.

नव्या इमारतीजवळ २० हजार लिटर ऑक्सिजन टॅंक बसवण्यात आल्याने दोनशे अतिरिक्त खाटांची सोय होणार आहे.
Mim Mp Imtiaz Jalil Thanks to Collector Aurangabad News
Mim Mp Imtiaz Jalil Thanks to Collector Aurangabad News

औरंगाबाद ः शासकीय वैद्यकीय रुग्णालय अर्थात घाटीमध्ये नव्याने २० हजार लिटर ऑक्सिजन साठवण क्षमता असणारे दोन टॅंक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे येथील एकूण साठवण क्षमता ३० हजार लीटर एवढी झाली आहे. तर या नव्या व्यवस्थेमुळे घाटीत आणखी दोनशे ऑक्सिजन बेडची व्यवस्था निर्माण होणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,रुग्ण संख्या पाहता उपयायोजना वाढवा, अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात होती. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी देखील कोरोना आढावा बैठकीत या संदर्भात लोकप्रतिनिधींना आश्वस्त केले होते. त्यानूसार तातडीने ही व्यवस्था उभी करण्यात येत असल्याने राजकीय पक्षांनी विशेषतः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, घाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मराठवाड्यात सर्वाधिक रुग्ण हे औरंगाबाद जिल्ह्यात आढळत आहेत. कोरोना महामारीच्या एक वर्षात औरंगाबाद जिल्ह्यात एक लाखाहून अधिक कोरोना बाधित आढळले. तर तीन हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुळे दगावले. रुग्णसंख्या वाढली की प्रशासनाकडून लाॅकडाऊन किंवा कडक निर्बंध लादण्याची तयारी सुरू केली जायची.  प्रशासनाच्या या निर्णयाला राजकीय पक्षांकडून कडाडून विरोध केला जायचा.

लाॅकडाऊन केले तर हातावर पोट असणाऱ्यांनी काय करायचे, त्यांच्या पोटापाण्याचे काय असा मुद्दा उपस्थित केला जायचा. शिवाय वर्षभरात राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने कोरोना रोगाशी दोन हात करण्यासाठी किती साधन सामुग्री, मुलभूत सुविधा उभारल्या यावरून देखील जाब विचारला गेला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली तेव्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊनची तयारी व घोषणा केली होती. तेव्हा या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध करत मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. हा मोर्चा जिल्हा प्रशासन, वैद्यकीय व आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणा व सर्व सामान्यांच्या समर्थनात काढण्याची घोषणा इम्तियाज जलील यांनी केली होती.

प्रयत्नांना यश..

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह महापालिकेच्या रुग्णालयातील सुविधा तातडीने वाढवा, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु नंतर लाॅकडाऊनचा निर्णय रद्द झाला आणि मोर्चाही. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी इम्तियाज जलील यांच्यांशी फोनवर संपर्क साधून वैद्यकीय सेवा अधिक अद्यावत करण्या संदर्भात चर्चा करून तसा शब्द दिला होता. अखेर तो पुर्ण होतांना दिसतो  आहे.

घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी इमारतीत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टर, नर्स व इतर कर्मचारी वर्ग देण्याची मागणी देखील पालकमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी या नव्या इमारतीजवळ २० हजार लिटर ऑक्सिजन टॅंक बसवण्यात आल्याने दोनशे अतिरिक्त खाटांची सोय होणार आहे. याबद्दल इम्तियाज जलील यांनी संबंधित यंत्रणेचे आभार मानले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com