Maharashtra Congress Criticize Raosaheb Danve news Aurangabad
Maharashtra Congress Criticize Raosaheb Danve news Aurangabad

सुई सहन न होणारे, देशासाठी गोळ्या, बाॅम्ब झेलणाऱ्या परिवारावर बोलतात..

दानवे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना मोकाट सांडाशी केली होती.

औरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका पक्षाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.  महाराष्ट्र काॅंग्रेसच्या वतीने गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग, छातीवर झेललेल्या गोळ्या आणि बाॅम्बची आठवण करून देत रावसाहेब दानवे यांना लक्ष केले आहे. (They talk about families who can't stand needles, Congress criticize Danve) कोरोना लस घेतांना त्याची सुई देखील सहन न होणाऱ्या दानवेंनी देशासाठी अमर झालेल्या परिवाराबद्दल बोलावं, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे आणि खडेबोल सुनावणारे ट्विट आपल्या अधिकृत पेजवर केले आहे.

जन आशिर्वाद यात्रे दरम्यान जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील भाषणात रावसाहेब दानवे यांनी काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना मोकाट सांडाशी केली होती. (Central State Railway Minister Raosaheb Danve) या टीकेनंतर राज्यभरातील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. (Congress Leader Rahul Gandhi) दानवे यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत अनेक ठिकाणी काॅंग्रेसने आंदोलनही केले. त्यांचे कार्यक्रम उधळण्याचे प्रयत्न देखील केले गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे महान आणि कार्यक्षम आहे, हे पटवून देतांना दानवे यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी निष्क्रीय असल्याचे आपल्या भाषणात सांगितले होते. (Maharashtra Pradesh Congress) हे सांगतांना त्यांनी गावात मोकाट फिरणाऱ्या, बिनकामाच्या सांड, वळू, बैलाशी राहुल गांधी यांची तुलना केली होती. दानवे यांचे हे भाषण सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर यावरून वादंग निर्माण झाले. अशातच काॅंग्रेसने आता थेट आपल्या ट्विटर हॅन्डलवरूनच रावसाहेब दानवे यांच्यावर निशणा साधला आहे.

कोरोना लस घेतांना टोचण्यात आलेली सुई देखील सहन न झालेल्या दानवे यांचा उल्लेख व त्याचे छायाचित्र पोस्ट करत काॅंग्रेसने दानवे यांना गांधी परिवाराबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे अधोरेखित केले आहे.

काॅंग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ज्या लोकांना साधी सई देखील सहन होत नाही, ते देशासाठी छातीवर गोळ्या आणि बाॅम्ब घेऊन अमर जालेल्या परिवाराबद्दल बोलतात.. अरे बाप्पा सिस्टर हळू.. असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काॅंग्रेसमध्ये संतापाचे वातावरण असून येणाऱ्या काळात दानवे विरुद्ध काॅंग्रेस असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com