या आधीच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते; गडकरींच्या खाद्यांवरून इम्तियाज यांचा निशाणा..

जालनारोडवर असलेले तीनपूल जोडून एक चिकलठाणा विमानताळापासून सुरू होणारा आणि बाबा पेट्रोल पंपाजवळ संपणारा अखंड पूल करण्यात येईल.
या आधीच्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते; गडकरींच्या खाद्यांवरून इम्तियाज यांचा निशाणा..
Mp imtiaz jalil -Nitin Gadkari news aurangabad

औरंगाबाद ः नाशिक, नगर, पुण्यात मी लांब पल्यांचे फ्लायओवर दिले, तसे औरंगाबादलाही दिले असेत. पण या आधीच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना व्हिजनच नव्हते, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याचा दावा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. (These earlier MPs had no vision) शहरातील जालनारोडवरील उड्डाणपूल आणि चिकलठाणा विमानतळासमोरील प्रस्तावित फ्लायओव्हरच्या संदर्भात इम्तियाज जलील यांनी नुकतीच दिल्लीत गडकरी यांची भेट घेतली.

या भेटीत झालेली चर्चा व निर्णयाची माहिती देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. (Central Minister Nitin Gadkari) यावेळी शहराला देखील नगर, नाशिक,पुण्या प्रमाणे शहराबाहेर निघणारा एकच मोठा उड्डाणपूल मिळाला, असता पण या आधीच्या कुठल्याच लोकप्रतिनिधीने अशी मागणी न केल्यामुळे तो मिळू शकला नाही. (AIMIM Mp Imtiaz Jalil Aurangabad) अशी माहिती स्वतः नितीन गडकरी यांनीच आपल्याला दिल्याचा दावा केला.

इम्तियाज जलील म्हणाले, शहरासाठी एक चांगली बातमी घेऊन मी आलो आहे. शहरातील उड्डाणपूल आणि विशेषतः विमातळासमोर उभारण्यात येणार पूल त्याऐवजी अमरप्रीत चौकात उभारण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मी गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत गडकरी साहेब तुम्ही आमच्यावर अन्याय का करत आहात? अशी तक्रार देखील केली. नगर, नाशिक, पुण्याला तुम्ही लांब असे पूल दिले, त्यासाठी कोट्यावधींचा निधीही दिला. मग औरंगाबादलाच सापत्न वागणूक का? कंजुशी का? असेही मी म्हणालो.

यावर गडकरीचे शब्द होते, की या आधी तुमच्या शहरातल्या कुठल्याच लोकप्रतिनिधीने माझ्याकडे एकच लांब उड्डाणपूल देण्याची मागणी केली नाही, त्यांच्यांकडे तसे व्हिजनच नव्हते. त्यामुळे शहरात छोटे-तुकड्यात पूल झाले. परंतु यातूनही काही मार्ग निघतो का? याचा आपण विचार करू. सध्या जालनारोडवर असलेले तीनपूल जोडून एक चिकलठाणा विमानताळापासून सुरू होणारा आणि बाबा पेट्रोल पंपाजवळ संपणारा अखंड पूल करण्यात येईल का? याचीही चाचपणी केली जाईल.

महिनाभरात याचा अहवाल तज्ञ समितीकडून मागवला जाईल आणि तसे शक्य झाल्यास जालना रोडवर एकच पूल बांधण्यात येईल. तांत्रिक समितीने अहवाल दिल्यास त्यासाठी कितीही पैसे लागले तरी ते मी देईन, पण हे काम पुर्ण केले जाईल. यासाठी जी अतिरिक्त जागा लागेल त्यासाठी राज्य शासना आणि महापालिकेने आम्हाला मदत करावी, असेही गडकरी यांनी सांगितल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

क्रांतीचौक ते केंब्रीजचाही विचार..

दुसरा एक पर्याय त्यांनी दिला तो म्हणजे, जालना रोडवरील तीन पुल एकमेकांना जोडणे शक्य झाले नाही तर क्रांतीचौकापासून ते केंब्रीज म्हणजेच शहराबाहेर निघणारा एक पूल उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असल्यामुळे यासाठीचा अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे जालना रोडवरील वाहतूकीचा प्रश्न सुटू शकतो, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

चिकलठाणा विमानतळासमोर होणाऱ्या उड्डाणपूलाला सर्वप्रथम मी विरोध दर्शवला, त्यानंतर सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी देखील माझ्या मागणीला पाठिंबा देते विमानतळाऐवजी आकाशवाणी चौक किंवा अमरप्रीत चौकात हा पूल उभारण्यात यावा, अशी मागणी केल्याचे इम्तियाज यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in