दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, पण...

प्रशासनाने वेळोवेळी लॉकडाऊन केले, पण त्याला नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या पाच वरून आज तीनशेवर पोहचली आहे. आता शहरात कडक लॉकडाऊन असावा, अशा सर्वसामान्यांच्या भावना आहेत.
divisional commissinor kendrekar news
divisional commissinor kendrekar news

औरंगाबादः शहर व ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहता दहा दिवसांचे कडक लॉकडाऊन असावे, अशी माझी देखील इच्छा आहे. पण हा लॉकडाऊन केवळ प्रशासनाचा न राहता तो जनतेने आपणहून पाळावा, असे आवाहन करतांनाच लोकांच्या आणि माझ्या भावना उद्या, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत मी मांडणार आहे. त्यानंतरच लॉकडाऊन करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले.

सध्या वाळूज, बजाजनगर या औद्योगिक भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर शहरात सायंकाळी सात ते पहाटे पाच दरम्यान या निर्णयांची अंमलबजावणी केली जात आहे. परंतु शहरातील रात्रीच्या संचारबंदीवरून लोकप्रतिनिधींमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी तर ‘कोरोनाने मी रात्रीच येईन, असे प्रशासनाला सांगितले आहे का‘, अशा शब्दांत प्रशासनाची खिल्ली उडवली होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र सातत्याने वाढच होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता सोमवारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी आज शहरातील कंटेनमेट भागात तसेच विविध कोविड सेंटरला भेट देत तेथील नागरिक आणि रुग्णांशी संवाद साधला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांनी नियम पाळणे महत्वाचे आहे, असे आवाहन करतांनाच केंद्रकर म्हणाले, प्रशासनाने वेळोवेळी लॉकडाऊन केले, पण त्याला नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळेच कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या पाच वरून आज तीनशेवर पोहचली आहे.

आता शहरात कडक लॉकडाऊन असावा, अशा सर्वसामान्यांच्या भावना आहेत. मलाही तसेच वाटते, त्यामुळे दहा दिवसांचा कडक आणि जनतेने स्वयंफुर्तीने पाळावा असा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार आम्ही करत आहोत. नागरिकांच्या सहभागाशिवाय लॉकडाऊन यशस्वी होऊ शकत नाही. कारण प्रशासनाने केलेले लॉकडाऊन यशस्वी झाले नाहीत, हे वाढत्या रुग्ण संख्येवरून स्पष्ट झाले आहे. 

लॉकडाऊन करायचा की नाही? याचा निर्णय उद्या, लोकप्रतिनिधींच्या बैठकीतच घेतला जाईल. लोकांच्या आणि माझ्या देखील भावना या लॉकडाऊन करावा अशाच आहेत, लोकप्रतिनिधींचा देखील याला पाठिंबा असेल. सोमवारच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. लॉकडाऊन करण्यावर सर्वांचे एकमत झाले, तर लोकांनी मात्र कठोरपणे याचे पालन करावे, तरच आपण आपल्या शहर आणि जिल्‍ह्याला कोरोनापासून मुक्त करू शकू असा विश्वासही केंद्रेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com