मुख्यमंत्र्यांवर कुणाचा दबाव नाही, ते निर्णय घ्यायला समर्थ आहेत..

राजधर्माचे पालन अनेकांनी करायचे असते. ज्याच्या हातात राजदंड आहे, त्या प्रत्येकाने करायचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राजधर्माचे पालन केले. त्यांचे आपण पाईक आहोत.
Shivsena Leader Sanjay Raut- CM Uddhav Thackeray News Aurangabad
Shivsena Leader Sanjay Raut- CM Uddhav Thackeray News Aurangabad

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाही. संजय राठोड यांच्या बाबत निर्णय घ्यायला मुख्यमंत्री समर्थ आहेत, असे स्पष्ट करतांनाच प्रसार माध्यमांनी न्यायालयाच्या भूमिकेत जाऊ नये, असा टोला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी लगावला. 

संजय राऊत औरंगाबादेत एका कार्यक्रमा निमित्त आले असतांना पत्रकारांशी बोलतांना त्यांनी संजय राठोड यांच्यासह महाराष्ट्रात शिवधर्माचेच राज्य आहे, या केलेल्या ट्विटबद्दल सविस्तर भूमिका स्पष्ट केली. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवधर्माचेच राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजधर्म चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यांना तो शिकविण्याची गरज नाही. राजधर्म सर्वांनीच पाळायचा असतो, मग ते सत्ताधारी असोत कि विरोधी.

संजय राठोड यांच्या राजीनाम्या संदर्भात बोलतांना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घ्यायला समर्थ आहे. ते कुणाचाही दबाव मानत नाहीत, त्याला जुमानत नाहीत. त्यामुळे योग्यवेळी ते योग्य निर्णय घेतील.

वन मंत्री संजय राठोड यांच्या बाबतीत सरकार राजधर्माचे पालन विसरले आहे का? या प्रश्नावर राजधर्माचे पालन अनेकांनी करायचे असते. ज्याच्या हातात राजदंड आहे, त्या प्रत्येकाने करायचे असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम राजधर्माचे पालन केले. त्यांचे आपण पाईक आहोत.

राजधर्माचे पालन केले नाही तर देश अडचणित येईल, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. देशात पंतप्रधानांवर सातत्याने टीका होत असते. महाराष्ट्रातही राज्यपाल ज्या प्रकारे राजकारण करतात ते वेगळ्या प्रकारचे आहे. तो राजधर्म नक्कीच नाही.

वेट अँड वॉच..

संजय राठोड यांच्यावरील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आहेत, तपास यंत्रणा आहे, पोलिस आहे, न्यायालय आहे. तुम्ही कशाला न्यायालयाच्या भूमिकेत जाताय, असा सवाल राऊत यांनी माध्यमांनाच केला. योग्य वेळी सगळ्या गोष्टी घडतील, वेट अँड वॉच, अशा सूचक इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com