रेमडीसीवरसाठी बीडमध्ये रांगा लावायची गरज नाही, आता तालुक्यातच मिळणार..

संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिटेंडेंट यांना इंजेक्शनचा पुरवठा करता येईल.
minister dhnanjay munde apeal to Beed Pepole news
minister dhnanjay munde apeal to Beed Pepole news

बीड ःरेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा आणि त्यासाठी रुग्णांचे नातेवाईक यांच्या बीड मुख्यालयात लागत असलेल्या रांगा, यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक निर्णय घेतला आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे इंजेक्शन उपलब्ध होणार आहे. या संदर्भात मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून माहिती दिली आहे आहे.

बीड मुख्यालयात लागणाऱ्या रांगा पाहून, रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ थांबवण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे उद्यापासून बीडला लाइनमध्ये उभे राहण्याची गरज लागणार नाही, तालुक्याच्या ठिकाणी इंजेक्शन मिळावे अशी व्यवस्था प्रशासनाने केली असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून बरेच राजकारण रंगले. सत्ताधारी विरुध्द विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप देखील झाले. विरोधकांना रेमडीसीवरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप केला.

भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी तर जिल्ह्यासाठी आलेले पाचशे इंजेक्शन कर्जत- जामखेडला पळवल्याचा आरोप केला होता. तर नकतेच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरत आम्हाला रेमडीसीवर का मिळत नाही? आम्ही पाकव्याप्त कश्मिरमध्ये राहतो का? असा सवाल केला होता.

यानंतरही रेमडीसीवर घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक व अन्य लोकांची धावाधाव होत होती. बीड मुख्यालयातून या इंजेक्शनचे वितरण होत असल्यामुळे इथे लांब रांगा लागत होत्या. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ही गैरसोय आणि रांगा टाळण्याच्या सूचना नुकत्याच प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर काही निर्णय घेण्यात आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात फेसबुकच्या माध्यमातून माहिती देत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रांगा न लावण्याचे आवाहन केले आहे. प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देतांना मुंडे यांनी एक पोस्ट केली आहे.

प्रत्येक रुग्णास एक इंजेक्शन

तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील खाजगी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांना, जर त्यांचे फिजिशियन यांनी रेमडीसिविर इंजेक्शन देणे आवश्यक आहे अशी शिफारस केली तर, त्यांची यादी करून ईमेलवर जिल्हा कार्यालयास पाठवावीत असे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि मेडिकल सुपरिटेंडेंट यांना इंजेक्शनचा पुरवठा करता येईल, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना बीड येथे येऊन आयटीआय येथे रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही. 

बीड जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा पुरवठा होईल त्यानुसार तो एजन्सीकडून उपलब्ध करून घेऊन अनुक्रमे नोंदणी प्रमाणे प्रत्येक रुग्णास एक याप्रमाणे त्यांचे रुग्णालयास (कोविड हॉस्पिटल) वाटप करण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश संबंधित तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.

तसेच आज बीड येथे आलेल्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवार (ता.२५)  रोजी आयटीआय येथे रेमडीसीविर इंजेक्शन साठी दुपारी साडेबारा पासून नोंदणी करता येईल. आजच्या दिवस बाहेरच्या तालुक्यातील रुग्णांसाठी देखील नोंदणी होईल. तथापि उद्यापासून त्यांनी त्यांच्या तालुक्याला नोंदणी करावी, बीडला येण्याची आवश्यकता नाही, असे या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com