महापालिका होऊन दहा वर्ष झाली तरी भूमिगत गटार योजना नाही? राज्यपालही झाले चकित..

महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा देखील राज्यपालांनी घेतला.
महापालिका होऊन दहा वर्ष झाली तरी भूमिगत गटार योजना नाही? राज्यपालही झाले चकित..
Governor Bhgatsingh Koshiyari news Parbhani

परभणी ः परभणी शहरात महापालिका अस्तित्वात येऊनही भुमागित गटार योजना अद्यापही नसल्याची बाब राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. ( Ten years after becoming a municipal corporation, there is no underground sewerage scheme? The governor was also shocked.)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.सहा) जिल्ह्यातील प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक कृषी विद्यापीठातील विश्रामगृहात झाली. परभणी महापालिकेला अस्तित्वात येवून अनेक १० वर्ष लोटली आहेत. (Municipal Corporation Parbhani)

असे असतांनाही शहरात म्हणाव्या तशा सुविधा उपलब्ध नाहीत. (Governor Bhagatsingh Kosyari, Maharashtra) एकीकडे महापालिकेचा दर्जा असतांनाही नगरपालिकेच्या हद्दीत राहत असल्याची भावना येथील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे.

नेमके याच प्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बोट ठेवत महापालिका प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर आपली नाराजी व्यक्त केली. शुक्रवारी कृषी विद्यापीठात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, पोलिस अधिक्षक जयंत मीना आदींची उपस्थिती होती.

यावेळी महापालिकेच्यावतीने शहरात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा देखील राज्यपालांनी घेतला. त्यावेळी शहरात भूमिगत गटार व्यवस्थेचा ४११ कोटीचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविण्यात आलेला आहे.

त्यास तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यतेची प्रतिक्षा असल्याची बाब जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी राज्यपालांसमोर मांडली. हे काम अद्यापही होत कसे नाही यावर राज्यपालांनी आश्चर्य व्यक्त केले.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in