तेजस ठाकरेंना राजकारणात रस नाही, ते वन्यजीवांमध्येच रमतात..

आम्ही पदाधिकाऱ्यांसाठीच तो कार्यक्रम आयोजित केला होता, पण करोनाकाळानंतर बऱ्याच महिन्यांची राजकीय कार्यक्रम होत असल्याने कार्यकर्ते उत्साहाने आले.
Yuva Sena Melawa Aurangabad news
Yuva Sena Melawa Aurangabad news

औरंगाबाद ः शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी नुकतेच तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे युवासेनेची धुरा तेजस ठाकरे सांभाळणार असे बोलले जात आहे. (Tejas Thackeray is not interested in politics, he plays in the wild. Said, yuvasena Secretery Varun Sardesai) मात्र यावर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी तेजस ठाकरे यांना वन्यजीवांची आवड आहे, ते त्यातच रमतात. राजकारणात त्यांना यायचे असेल तर याचा निर्णय ते स्वतः किंवा ठाकरे कुटुंबियच घेईल, असे स्पष्ट केले.

ठाकरे घराण्यातील आणखी  एका तरूण नेत्यांचा राजकारणात प्रवेश होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. हा नेता दुसरा तिसरा कोणी नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांचे बंधू आहेत. (Yuvasena Maharashtra) या चर्चेला अधिकच हवा मिळाली ती मिलिंद नार्वेकर यांच्या शुभेच्छा बॅनरमुळे. शिवाय आदित्य ठाकरे आता मंत्री म्हणून काम करत असल्यामुळे युवासेनेची जबाबदारी तेजस ठाकरे यांच्यावर दिली जाणार असल्याचे बोलले जात होते.

परंतु या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे युवासेनेचे सचिव वरुण देसाई यांनी स्पष्ट केले. युवासेना पदाधिकारी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने वरुण सरदेसाई औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. (Yuvasena Chief Aditya Thackeray) तेजस ठाकरे यांच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले,  तेजस ठाकरे वन्यजीव प्रेमी आहेत, त्यांनी वन्यजीवांच्या सहा ते सात प्रजाती शोधून काढल्या आहेत, ते त्यातच रमतात. राजकारणात त्यांना यायचे असेल तर त्या बद्दलचा निर्णय ते स्वत: आणि त्यांचे कुटुंबिय घेतील, पण त्यांची आवड वन्यजीवातच आहे.

आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसारच पदाधिकारी संवाद दौरा सुरु केला असून  आदित्य ठाकरे हेच युवासेनेचे नेते आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. संवाद दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत असून दोन महिन्यापूर्वी आपण औरंगाबाद दौऱ्यावर आलो होतो तेव्हा युवासेनेच्या मुलाखती झाल्या. त्यातून चार जिल्हाप्रमुख नेमण्यात आले, युवासेनेची टीम अजूनही मोठी होईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

चूक झाली  असेल तर कारवाई करावी..

बीड आणि जालना येथील पदाधिकारी संवाद कार्यक्रमात मोठी गर्दी झाली होती.  ही गर्दी करोनाचा नियमभंग करणारी नाही का ? मुख्यमंत्र्यांनी राजकीय कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही, नाट्यगृह देखील बंद ठेवण्यात आले आहेत, असे असताना तुम्हाला नाट्यगृह कसे मिळाले, गर्दी झाली हा नियमभंग नाही का? असा सवाल वरुण सरदेसाई यांना केला.

आम्ही पदाधिकाऱ्यांसाठीच तो कार्यक्रम आयोजित केला होता, पण करोनाकाळानंतर बऱ्याच महिन्यांची राजकीय कार्यक्रम होत असल्याने कार्यकर्ते उत्साहाने आले. आमची चुक झाली असेल, नियमांचा भंग झाला असेल, तर प्रशासन कारवाई करेल, त्यांनी ती करावी, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत युवासेनेच्या पदाधिकारी –कार्यकर्त्यांना पुरेशा प्रमाणात संधी द्यावी अशी, भूमिका आपण घेणार आहात का? यावरही आपण आग्रही नाही, शिवसेनेचे नेते या बद्दल योग्य तो निर्णय घेतील असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com