गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन, मत मागायला ऊसतोड कामगार मंडळ सुरू केलेले नाही...

या महामंडळाच्या माध्यमातून प्रतिटनामागे सारख कारखान्यांकडून १० व सरकारचे १० असे एकूण २० रुपये अनुदान महामंडळाला देण्याचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतला.
minister dhnanjay munde  news Georai, Beed
minister dhnanjay munde news Georai, Beed

गेवराई ः एका ऊसतोड कामगारांच्या मुलाला शरद पवारांनी मंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे या ऊसतोड मंजुरांच्या कल्याणासाठी ऊसतोड कल्याणकारी महामंडळ सुरू करू शकलो. (Taking the name of Gopinath Munde, the Ustod Kamgar Mandal has not started asking for votes)  फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन मत मागायलला ते सुरू केले नाही, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पकंजा मुंडे यांना लगावला.

गेवराई येथे आयोजित कोविड योद्ध्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या शारदा प्रतिष्ठाणच्या वतीने या कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Minister Dhnanjay Munde) भैय्यासाहेब लवकरच आम्ही तुमचा सत्कार करू, पण तो कोरोनामध्ये काम केले म्हणून नाही, तर इतर कारणांसाठी असा सूचक संदेश देखील मुंडे यांनी जाहीरपणे दिला. त्यामुळे अमरसिंह पंडित यांना पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या कुटंब उद्धवस्त झाली. माझ्या परिचयातल्या तर अनेक कुटुंबांमध्ये माणसंच शिल्लक राहीली नाही. (Ncp Genral Secretery Amarsinh Pandit) सात्वंन करायला जाऊ तर कुणाकडे असा प्रश्न? या कोरोनाने निर्माण केला. निसर्गाच्या विपरित आपण वागलो की तो आपल्यावर कोपतो हे कोरोनाने दाखवून दिले. तिसरी लाट येऊ नये अशीच माझी व आपल्या सगळ्यांची इच्छा असयाला हवी.

कोरोनाने आपल्या एवढा धडा दिला तरी आपण अजूनही त्याला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. मला दोनदा कोरोना झाला, व्हॅक्सीन आली, घेतली म्हणून आपण बोंबलत, मास्क न घालता फिरायचं हे कृपया टाळा, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे. व्हॅक्सीन घेतल्यावर देखील मला कोरोना झाला होता, तेव्हा तिसरी लाट येऊ द्यायची नसेल, तर कोरोनाचे नियम पाळा, असे आवाहन देखील मुंडे यांनी यावेळी केले.

ऊसतोड कामगाराच्या मुलाला मंत्री केले..

ऊसतोड मंजुर हा टनांनी ऊस तोडतो पण तो उपेक्षितच राहतो. पहाटे तीन वाजता ऊसाच्या फडात शिरायचे आणि नाव्हेंबरच्या थंडीपर्यंत ऊसतोडणीसाठी भटकंती करायची, पण त्याबदल्यात त्याला योग्य मोबदला देखील मिळत नव्हता. पण एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला शरद पवारांनी मंत्री केले आणि मला ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ सुरू करण्याची संधी मिळाली.

या महामंडळाच्या माध्यमातून प्रतिटनामागे सारख कारखान्यांकडून १० व सरकारचे १० असे एकूण २० रुपये अनुदान महामंडळाला देण्याचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतला. ऊसतोड कामगारांचाय मुला-मुलींसाठी १० निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला आहे. पहिल्या टप्यातील या शाळांमध्ये गेवराई, माजलगांव, पाटोदा, अंबड, घनसांवगी, कर्जतसह काही तालुक्यांचा समावेश आहे.

महामंडळ स्थापन करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली आहे. फक्त दिवंगत गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यायचे, त्यांच्या नावावर मतं मागायची,असे आता होणार नाही. ऊसतोड मजुरांसाठी खूप काही करायचे आहे, हे काम छोटे नाही यासाठी सगळ्यांच्या मदतीची गरज भासणार आहे, असेही मुंडे म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com