राहुल गांधीचा निरोप घेऊन काॅंग्रेस सरचिटणीस वेणूगोपाल सातव कुटुंबियांना भेटले..

राहुल गांधी हे सातव कुटुंबाची भेट घेण्यासाठी हिंगोलीत येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
Congress leader Venugpal Visit Satav house Kalmnuri News
Congress leader Venugpal Visit Satav house Kalmnuri News

हिंगोली ः काॅंग्रेसचे राज्यसभेतील खासदार दिवगंत राजीव सातव यांच्या निधनानंतर आज  काॅंग्रेसचे सरचिटणीस खासदार वेणूगोपाल यांनी सातव कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सातव यांच्या मातोश्री रजनी सातव, पत्नी प्रज्ञा व मुलांशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली. विशेष म्हणजे या भेटीबाबत विशेष गुप्तता पाळण्यात आली होती. (Taking leave of Rahul Gandhi, Venugopal met the seventh family.) या भेटीच्या चित्रीकरणाला देखील परवानगी नाकारण्यात आली होती. काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा महत्वाचा निरोप घेऊन वेणूगोपाल आले होते, असे देखील बोलले जाते.

राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू आणि काॅंग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. वयाच्या ४६ व्या वर्षी सातव यांनी कोरोनावर मात केली, मात्र त्यांनतर इतर आजारांनी त्यांना ग्रासले आणि त्यातच सातव यांची प्राणज्योत मालवली. (Congress leader MP Rajiv Satav passed away last week.) सातव यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे काॅंग्रेसला धक्का बसला. मराठवाड्यासह राज्य आणि देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांनी सातव यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आपल्या सद्भावना व्यक्त केल्या होत्या.

कोरोना संकटामुळे देशपातळीवरील नेत्यांना सातव यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहाता आले नव्हते. राहुल गांधी, प्रियकां गांधी, यांच्यासह देशभरातील काॅग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सातव यांना व्हर्च्युअल पद्धतीन श्रद्धांजली अर्पण केली होती.(Rahul Gandhi and Priyanka Gandhi were very emotional while reminiscing about Satav.) राहुल गांधी, प्रियंका गांधी हे तर सातव यांच्या आठवणी सांगतांना अत्यंत भावूक झाले होते. राहुल गांधी यांनी आपल्या श्रद्धांजलीपर निवदेनात सातव कुटुंबियांचे सात्वंन करतांना आपण स्वतः व संपुर्ण काॅंग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही दिली होती.

तर प्रियकां गांधी यांनी सातव यांच्या वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाल्यामुळे त्यांना आपले वडील राजीव गांधी यांची आठवण झाल्याचे व आपल्या कुटुंबातील व्यक्ती गेल्याचे दुःख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधी हे सातव कुटुंबाची भेट घेण्यासाठी हिंगोलीत येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पोलिस सुत्रांकडून देखील याला दुजोरा देण्यात आला होता.

भेटीत काय चर्चा झाली..

मात्र आज अचानक काॅंग्रेसचे नेते व खासदार के.सी वेणूगोपाल हे सातव यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सातव कुटुंबीयांची भेट घेण्याकरिता दिल्ली येथून विमानाने नांदेड येथे आले तेथून थेट त्यांनी कळमनुरी गाठली. राजीव सातव यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे सह सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी श्री संपत कुमार, खासदार माणिक टागोर, पक्षाचे सह सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी वामसी रेडी, पालकमंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री डी पी सावंत, आमदार राजेश राठोड, अमर राजूरकर ,मोहन हंबर्डे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदी उपस्थित होते.

अर्धा तास त्यांनी सातव कुटुंबियांशी चर्चा करत राजीव सातव यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे या भेटीचे चित्रीकरण करण्यास प्रसार माध्यमांना परवानगी नाकारण्यात आली होती. नुकतीच सातव यांच्या अस्थी कलशाची यात्रा देखील काढण्यात आली होती.

त्यानंतर आजच वेणुगोपाल यांनी सातव कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. राहुल गांधी हे सातव कुटुंबियांची भेट घेण्यासााठी येणार होते, परंतु त्यांचा दौरा लांबणीवर पडल्यामुळेच त्यांनी आपले विश्वासून वेणूगोपाल यांना पाठवल्याचे बोलले जाते. (Venugopal visited the seventh family and paid their last respects.) यावेळी राहुल गांधी यांचा महत्वाचा संदेश देखील सातव कुटुंबियांना त्यांनी दिल्याची चर्चा आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com