लोकांचे प्रश्न हाती घ्या, ते आपल्या पाठीशी नक्की उभे राहतात..

राजकारणात होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं हे घडू शकते आणि हे पवारसाहेबच करु शकतात.
Ncp Leader Jayant Patil News Nanded
Ncp Leader Jayant Patil News Nanded

नांदेड  : लोकांच्या हिताचे प्रश्न हाती घेतले तर आपल्यापाठी लोक नक्की उभे राहतात, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केला. (Take people's questions, they stand with their backs to you.) राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या तिसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले, पक्ष मजबूत करायचा असेल तर पक्षाचे सगळे सेल मजबूत करायला हवेत. (Ncp State President Jayant Patil)  या लोहा - कंधार मतदारसंघात विजय कुणाचा झाला त्यापेक्षा पक्षाचा पराभव कसा झाला, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Minister Dhnanjay Munde)  बुथवरील कमिट्यांनी झटून काम केले पाहिजे, आपली वरवरची रचना असता कामा नये.

वाडी-वस्त्यांमध्ये गेल्याशिवाय बुथ कमिट्यांचे हे नेटवर्क मजबूत होणे शक्य नाही.
प्रयत्नांती परमेश्वर असतो त्यामुळे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. 

राजकरण नाही, काम करायचे आहे..

राजकारण करणारे राजकारण करत राहतील मात्र आपल्याला इथे काम करायचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करा असे आवाहन जयंत पाटील अहमदपूर येथील आढावा बैठकी दरम्यान केले.  अहमदपूर राष्ट्रवादीने केलेली कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. बुथची योग्य रचना केल्याने बाबासाहेब पाटील यांच्या विजयाचा एक फॅक्टर ठरला.

ज्या भागात जिथे लक्ष दिले नाही तिथे पराभव झाला, बुथ कमिटीच्या संवाद कमी पडला तिथे कमी मताच्या फरकाने पराभव झाला. अहमदपूरने यापुढील काळातही उरलेल्या बुथ कमिट्या पूर्ण करून पक्ष अधिक मजबूत करावा, असेही जयंत पाटील म्हणाले.

मराठवाड्यात अधिक सुविधा कशा देता येईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मराठवाड्यात पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंपदा विभागाने कंबर कसली आहे. येत्या काळात मराठवाड्याला मुबलक पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध राहिल. आज विरोधक ओबीसी आरक्षणावरून राजकारण करत आहेत. राज्यातील ओबीसी नेतृत्व संपवण्याचा घाट ज्यांनी घातला, तेच आज आंदोलन करत आहेत हे हास्यास्पद वाटले.

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दौरा..

२०१९ च्या निवडणुक निकालानंतर सत्ता कुणाची येईल असं कुणाला वाटलं नव्हतं, परंतु लोकशाहीत असं घडू शकतं हे पवारसाहेबांनी दाखवून दिले. राजकारणात होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं हे घडू शकते आणि हे पवारसाहेबच करु शकतात हे जगभराने पाहिल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. सत्तेत आल्यावर राज्यातील आपले कार्यकर्ते काय करत आहेत, त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दौरा आयोजित केला आहे. या संवादाच्या बळातूनच आम्हाला ताकद मिळते. हा संवाद दौरा ताकद देण्यासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.  

यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी खासदार व मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, आमदार विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com