आरोग्य विभागाची परिक्षा पुन्हा ‘एमपीएससी’ मार्फत घ्या

परीक्षेत नियोजनाचा अभाव आणि अनेक उमेदवारांना सिल फुटलेले पेपर मिळाल्याचा आरोपही आमदार विनायक मेटे यांनी केला.
Mla Vinyak Mete-beed-Assembly Session News
Mla Vinyak Mete-beed-Assembly Session News


बीड : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २८ फेब्रुवारीला घेतलेल्या परिक्षेत प्रचंड गोंधळ व गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याचा आरोप करत या परीक्षा पुन्हा एमपीएससीमार्फत घ्याव्यात, अशी मागणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली.

सोमवारी विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात मेटे यांनी नुकत्याच झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेबद्दल प्रश्न मांडला. अत्यंत मेहनतीने परीक्षेची तयारी केलेल्या अनेक उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाले नाही, सील फुटलेले पेपर उमेदवारांना देण्यात आले, परीक्षेसाठी चांगली आसनव्यवस्था नव्हती असे सांगत परिक्षेच्या नियोजनाचा बटटयाबोळ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच स्टाफ नर्स पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये संबंधित विषयास अनुसरुन प्रश्नही नव्हते. परीक्षेतील सदोष आसनव्यवस्थेमुळे कित्येक डमी उमेदवार परिक्षेला बसल्याची शंका उपस्थित करत पुण्यातील काही केंद्रावर तर अर्धा तास उशिराने परिक्षा सुरु झाल्याचा दावा मेटे यांनी केला.

मराठवाडा, कोकण व विदर्भ या ठिकाणी एकाच बाकावर दोन परिक्षार्थी बसवून नकल (कॉपी) करुन प्रश्नपत्रिका सोडविल्याची बाबही समोर येत आहे. या परिक्षेमध्ये मोबाईल व तत्सम इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर झाला असल्याचेही बोलले जाते.अनेकांनी कोऱ्या उत्तरपत्रिका दिल्याचे निदर्शनास आल्याचेही मेटे म्हणाले.

मान्यताप्राप्त व नामांकित एजन्सीला डावलून ब्लॅक लिस्टेड एजन्सीमार्फत परिक्षा घेऊन ही अनियमितता संघटीतपणे केली असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यातून उमेदवार व पालकांकडून संताप होत आहे. त्यामुळे सदर परिक्षा नव्याने ‘एमपीएससी’ मार्फत घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी निर्णय जाहीर करण्याचे सांगीतले. मात्र, अद्याप सदनाला माहिती दिली नसल्याचेही मेटे म्हणाले.

Edited By: Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com