केंद्रातील जनकल्याणाच्या योजनांचा लाभ घ्या, पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा..

मराठवाड्यातील व्यक्तीला एवढी मोठी संधी मिळाल्यामुळे सहाजिकच तुमच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या आहेत.
Minister Dr.Karad Appeal-Jan Ashirwad Rally  News Aurangabad
Minister Dr.Karad Appeal-Jan Ashirwad Rally News Aurangabad

गंगाखेड ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीब माणूस केंद्रबिंदू मानून जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना लागू केल्या. उज्वला गॅस योजना, जनधन खाते, कोरोना काळात तीन लाख कोटींचे पॅंकेज, लोकांना मोफत धान्य, उद्योग, शेतकरी अशा सगळ्याच घटकांना मदत करण्याचे काम केंद्रातील सरकारने केले आहे. (Take advantage of public welfare schemes at the Center, strengthen the hands of Prime Minister Modi.) तेव्हा जनकल्याणाच्या योजनांचा लाभ घ्या, आणि यापुढे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी केले.

कराड यांच्या नेतृत्वाखाली आजपासून  गोपीनाथ गडावरून भाजपच्या जनआशिर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. (Central State Minister Dr.Bhgawat Karad Apeeal People) तत्पुर्वी डाॅ.कराड यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत परळीच्या वैद्यनाथाचे प्रवेशद्वारावरूनच दर्शन घेत आरती केली. (Jan Ashirwad Rally In Marathwada) त्यानंतर गोपीनाथ गडावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांनी जनआशिर्वाद यात्रेला सुरूवात केली. गंगाखेडमध्ये या यात्रेचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. अनेकांनी डाॅ. कराड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना मंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डाॅ. कराड यांनी केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली. कराड म्हणाले, देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केंद्रातील सरकार पंतप्रधांनांच्या नेतृत्वाखाली करत आहे. गोर-गरीबांच्या थेट खात्यात मदत जमा करण्याच्या निर्णयामुळे आता सरकारी योजनांचा लाभ थेट संबंधित व्यक्तीला होत आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात देखील विविध योजनांच्या माध्यमातून पैसे जमा केले जात असल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शेती, उद्योग, शैक्षणिक,सुरक्षा अशा सर्वच क्षेत्रात केंद्राने भरीव कामगिरी केली. कोरोना महामारीच्या काळात जेव्हा राज्यातील सरकार हातावर हात ठेवून बसले होते, तेव्हा केंद्रांने औषधी, अन्नधान्य, कोरोनावरील लस, व्हेंटिलेटर, आॅक्सीजनचे प्लांट अशा सर्व प्रकारची मदत केली. कोरोना काळात कुणीही अन्नपाण्याशिवाय राहू नये, यासाठी रेशनच्या माध्यमातून मोफत धान्य दिल्यामुळे लाॅकडाऊन आणि कोरोना काळात देखील गरीबांना मोठा आधार मिळाला.

उद्योग-व्यवसाय पुन्हा उभे राहावेत यासाठी तीन लाख कोटींचे पॅकेज या सरकारने दिली. जनधन योजनेच्या माध्मयातून ज्याने कधी बॅंकेची पायरी चढली नाही अशा कोट्यावधी लोकांचे खाते उघडले. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून चूलीच्या धुरातून लाखो, करोडो माता-भगिनींची सुटका केली. त्यामुळे मोदी सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ घ्या, आणि यापुढेही मोदीजींचे हात बळकट करा, असे आवाहन देखील कराड यांनी केले.

मागसलेपणा दूर करण्यासाठी झटणार..

केंद्रात माझ्यावर आता  अर्थ राज्यमंत्री म्हणून जबादारी आली आहे. मराठवाड्यातील व्यक्तीला एवढी मोठी संधी मिळाल्यामुळे सहाजिकच तुमच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या आहेत. मला याची जाणीव आहे, त्यामुळे मराठवाड्याचे मागासलेपण, मग ते शेती, शिक्षण, उद्योग असेल की मग अन्य क्षेत्रातले ते घालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे.

काही व्यापाऱ्यांनी मला जीएसटी संदर्भात निवेदन दिले, त्यांच्या अडचणी सांगितल्या. यावर देखील मी जी मदत करणे शक्य होईल, ती करण्याचा निश्चित प्रयत्न करेल, असे आश्वासनही डाॅ. कराड यांनी यावेळी दिले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com