फोनवरून लाच मागितली, टोकन रक्कम स्वीकारतांनाच जाळ्यात अडकले..

तब्बल एक लाख दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
Osmanabad News-Bhum  raid News
Osmanabad News-Bhum raid News

उस्मानाबाद : भुम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांनी कोतवाल विलास जानकर यांच्या हस्ते एक लाखांची लाच घेतल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानकर यास रंगेहात पकडले. (Sub-divisional officer asked for bribe over phone, while accepting token amount, Kotwal was caught.) मनिषा अरुण राशिनकर (वय ४५) उप विभागिय अधिकारी,उप विभाग भुम, विलास नरसींग जानकर, (वय ३२) कोतवाल, देवळाली सज्जा प्रतीनियुक्ति उप विभागिय अधिकारी कार्यालय भुम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Osmanabad Districts Bhum Sab-division Officer) ३० जुलैपर्यंत ही कोठडी असणार आहे. या दोघांनी लाचेची मागणी करुन विनाकारवाई वाहने वाळु वाहतुक करण्याचे आमिष दिले होते. यासाठी तब्बल एक लाख दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती  ९० हजार रुपये व २० हजार रुपये आरोपी विलास जानकर याच्या हस्ते स्विकारले.

दोघांची रवानगी पोलीस कोठडीत..

तक्रारदार यांचा एक टीप्पर, त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी.व तीन ट्राक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी आरोपी मनिषा राशिनकर व विलास जानकर यांनी तक्रारदार याच्याकडे प्रती महिना एक लाख दहा हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.  तडजोडी नंतर ९० हजार देण्याचे ठरले.

त्यापैकी २० हजार रुपये लाच विलास जानकर यांच्या हस्ते स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध भुम पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.  सापळा अधिकारी म्हणुन पोलिस उपअधीक्षक  प्रशांत संपते यांनी काम पाहिले. उस्मानाबाद सापळा पथकामध्ये - पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com