शासकीय रुग्णालयातील ‘एंजट'चा वाढता हस्तक्षेप रोखा..

रूग्णाालय परिसरात फिरणारे एजंट रूग्णांच्या नातेवाईकांना हेरतात व त्यांचे संबंध असलेल्या रक्तपेढीतून रक्त मिळवून देतात. परंतु त्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांकडून ‘एजंट’ जास्तीचे पैसे उकळतात असे प्रकार देखील समोर आले आहेत. याचप्रमाणे औषधींच्या बाबत देखील विविध रूग्णांच्या नातेवाईकांची ‘एजंट’ कडून लुबाडणूक होत असून यासाठी काही मेडिकल मालक या ‘एजंट’ला कमिशन देत असल्याची माहिती आहे.
mla satish chavan letter to police commissioner news
mla satish chavan letter to police commissioner news

औरंगाबादः शासकीय वैद्यकीय रुग्णालय, महाविद्यालय अर्थात घाटीमध्ये बाहेरील एजंटचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे अनेक सामाजिक संस्था आणि स्वंयसेवक गोरगरीब रुग्णांना अन्नधान्य आणि औषधोपचारासाठी निस्वार्थ भावनेने मदत करतात, तर दुसरीकडे काही खाजगी एजंट रुग्णांची लूट करुन त्यांची पिळवणूक करत असल्याचेही वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

कोरोना संकटाच्या काळात घाटीतील औषधी घोटाळा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उघडकीस आणल्यानंतर आता मराठवाडा पदवीधरचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी एजंटचा हस्तक्षेप रोखावा, यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना पत्र देऊन या एजंटाचा घाटीतील हस्तक्षेप रोखून त्यांना आळा घाला, अशी मागणी चव्हाण यांनी नुकतीच केली.

घाटी रुग्णालय हे केवळ मराठवाडाच नाही तर विदर्भ व खान्देशातील गोरगरीब रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदान देणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून लाखोंच्यावर रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. शासनाकडून देखील येथे भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून वेळोवेळी यंत्र सामुग्री, औषधींसाठी निधी उपलब्ध करून दिला. पण मदतीच्या नावाखाली काही अपप्रवृतीचे खाजगी एजंट यांचा वावर घाटीत वाढला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतीश चव्हाण यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट देऊन येथील अडचणी जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने बाहेरील एजंटाचा हस्तक्षेप यावर चर्चा झाली. गोर गरीब रूग्णांसाठी महत्वाचा आधार म्हणून घाटी ओळखले जाते. याठिकाणी मराठवाड्यासह नगर, जळगाव, धुळे, बुलडाणा आदी जिल्ह्यातील रूग्ण देखील उपचारासाठी येतात.

काही वेळेस रूग्णाला वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता भासते. अशावेळी घाटीतील रक्तपेढीतून रक्त पुरवठा केला जातो. परंतु रूग्णांचा रक्तगट जर घाटीच्या रक्तपेढीत उपलब्ध नसेल तर आपातकालीन परिस्थितीत बाहेरून रक्त आणण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात येते.

कमिशनचे धंदे..

अशावेळी रूग्णाालय परिसरात फिरणारे एजंट रूग्णांच्या नातेवाईकांना हेरतात व त्यांचे संबंध असलेल्या रक्तपेढीतून रक्त मिळवून देतात. परंतु त्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांकडून ‘एजंट’ जास्तीचे पैसे उकळतात असे प्रकार देखील समोर आले आहेत.

याचप्रमाणे औषधींच्या बाबत देखील विविध रूग्णांच्या नातेवाईकांची ‘एजंट’ कडून लुबाडणूक होत असून यासाठी काही मेडिकल मालक या ‘एजंट’ला कमिशन देत असल्याची माहिती आहे. हे ‘एजंट’ घाटी परिसरात वावरतांना घाटीचे कर्मचारी असल्यासारखे वागतात. त्यामुळे घाटीतील ‘एजंट’ यांचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सतीश चव्हाण यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com