गुंडाकडून सक्तीची वसुली थांबवा, अन्यथा रिक्षा, काळीपिवळी जिल्हाधिकारी कार्यालयात आणू...

रिकव्हरी एजंट गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते वसुली करण्यासाठी बळजबरी करणे, दादागिरी करुन घरातील व्यक्तींना व महिलांना धमकावत आहेत.
Mp Imtia Jalil Letter to Collector and Commissioner news
Mp Imtia Jalil Letter to Collector and Commissioner news

औरंगाबाद : कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात अ‍ॅटोरिक्षा व इतर प्रवासी वाहनांचे थकीत बँक हफ्ते वसुलीसाठी बॅंकांचे एजंट कर्जदारांना धमकावत आहेत. (Stop forced recovery, otherwise we will bring rickshaws to the Collector's office,warn Mp Imtiaz Jalil) गुंड प्रवृत्तीच्या खाजगी रिकव्हरी एजंटना त्वरीत पाबंद घालावा, अशी मागणी  खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांना पत्र पाठवून केली आहे. 

कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतुकीची खाजगी वाहने देखील बंद आहेत. त्याआधीच्या पहिल्या कोरोना लाटेत देखील सहा महिन्यांहून अधिक काळ लाॅकडाऊन होता. त्यामुळे रिक्षा व काळीपिवळी चालकांना आपली वाहने चालवता आली नाही.

या वाहनांवर कर्ज असल्यामुळे सध्या बॅंकांनी खाजगी एजंट नेमूण सक्तीने वसुली सुरू केली आहे. गुंड प्रवृत्तीचे हे एजंट रिक्षा व काळीपिवळी चालकांना धमकावत असल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. (The courtesy board met Imtiaz Jalil and demanded an end to the forced recovery) या संदर्भात नुकतीच एका शिष्ट मंडळाने इम्तियाज जलील यांची भेट घेऊन सक्तीची वसुली थांबवा अशी मागणी केली होती.

या संदर्भात इम्तियाज जलील यांनी नकतेच जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून या मुद्याकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. कोरोना महामारी व संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक व वैद्यकीय सेवेशी निगडीत उद्योगांना परवानगी देण्यात आलेली आहे.  इतर सर्व प्रकारचे कामधंदे, उद्योग व पर्यटन स्थळे बंद असल्याने अ‍ॅटोरिक्षा व इतर प्रवासी वाहने चालविणाऱ्या गोरगरीब मालक व चालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.       

अशा बिकट परिस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँका व फायनान्स कंपन्यांनी बँकेची हफ्ते वसुली करण्यासाठी बाउंन्सर, गुन्हेगारी पाश्र्वभुमी असलेले गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोरगरीब मालक व चालक यांच्याकडे सकाळी व मध्यरात्रीच्या वेळी पाठवून धमकावणे सुरू केले आहे. (Private banks and finance companies hire bouncers, goons with criminal backgrounds to recover bank fees) सदरील रिकव्हरी एजंट गुंड प्रवृत्तीचे असल्याने ते वसुली करण्यासाठी बळजबरी करणे, दादागिरी करुन घरातील व्यक्तींना व महिलांना धमकावणे तसेच सर्रासपणे अर्वाच्च भाषेचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.

यातून मानसिक तणावत असलेल्या अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे देखील अनेकांनी आपल्याकडे बोलून दाखवल्याचे इम्तियाज यांनी या पत्रात नमूद केले आहे.  गोरगरीब चालक व मालक यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन औरंगाबाद जिल्ह्यातील खाजगी बँक व फायनान्स कंपन्यांची संयुक्त बैठक घेवुन नाहक त्रास देणाऱ्या सर्व संबंधितांविरुध्द कायदेशिर कार्यवाही करावी, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

तर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात ..

कोरोनाच्या काळात अ‍ॅटोरिक्शा, काळी पिवळी टॅक्सी व इतर प्रवासी वाहनांचे हफ्ते वसुली थांबली नाही तर सर्व गोरगरीब चालक व मालक हे त्यांचे जवळील वाहनांची हप्ते सक्तीची वसुली थांबली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात सगळी वाहन जमा करण्याचा इशारा देखील इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

वाहने जमा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सर्व चालक व मालक यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहसाठी दररोज प्रत्येकी १००० रुपये द्यावेत, (Rs.1000 per day should be paid for the subsistence of the family) अन्यथा या सर्वांसोबत मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करीन, असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com