कोरोना लसीचे एक्सपोर्ट थांबवा, आता देशातील प्रत्येक वयाच्या नागरिकाला व्हॅक्सीन द्या.. - Stop export of corona vaccine, now vaccinate every age group in the country. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

कोरोना लसीचे एक्सपोर्ट थांबवा, आता देशातील प्रत्येक वयाच्या नागरिकाला व्हॅक्सीन द्या..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

केंद्र सरकारकडून राज्याला कोरोना लसीचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याचा आरोप आणि इतर राज्यांची आकडेवारी राज्य सरकारकडून समोर ठेवली जात आहे.

औरंगाबाद ः देशात कोरोनाची स्थिती भयंकर आहे, आता प्रत्येक वयाच्या नागरिकाला कोरोनाची लस देणे गरजेचे आहे. तेव्हा केंद्र सरकारने कोरोना लसीची निर्यात थांबवून आधी आपल्या देशातील, जिथे रुग्ण संख्या झपाट्याने वाढते आहे, त्या राज्यात लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवावा, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

राज्याला होणारा कोरोना लसीचा पुरवठा त्यावरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारकडे देशातील प्रत्येक वयाच्या नागरिकाला कोरोनाची लस देण्याची मागणी केली आहे. देशातील काही राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. दररोज वाढणारे हजारो रुग्ण आणि दगावणाऱ्यांची संख्या ही धडकी भरायला लावणारी आहे.

कोरोना नियमांचे पालन कठोरपणे करण्याचे आवाहन सरकारकडून सरू आहे, केंद्र सरकारकडून राज्याला कोरोना लसीचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याचा आरोप आणि इतर राज्यांची आकडेवारी राज्य सरकारकडून समोर ठेवली जात आहे.लाॅकडाऊन, ब्रेक द चेन सारखे उपक्रम देखील राबवले जात आहेत. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट यावर देखील सरकारने भर दिला आहे.

परंतु ज्या वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे, त्या तुलनेत केल्या जात असलेल्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे यावरून राजकारण सुरू असतांनाच आता अशोक चव्हाण यांनी एक मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता आता केंद्र सरकारने व्यापक स्वरुपात देशातील प्रत्येक नागरिकाला वयाची अट न घालता कोरोनाची लस द्यावी. जेणेकरून लोकांचे जीव वाचतील. त्यासाठी आधी कोरोना लसीचे एक्सपोर्ट थांबवावे, आधी देशाची गरज पुर्ण करावी,  ती करत असतांना कुठल्या राज्यात काय परिस्थिती आहे, हे पाहून कोरोना लसींचा पुरवठा करावा. आता सरसकट सगळ्यांनाच कोरोना लस देण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने तातडीने हाती घ्यावा, असे देखील अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटद्वारे केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख