अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेकडून दगडफेक

पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा पोचला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू आहे.
Minister ashok chvan news nanded
Minister ashok chvan news nanded

नांदेड ः राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या `आनंद निलयम`, या बंगल्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास एका अज्ञात महिलेने दगडफेक केली. (Stone pelted at Ashok Chavan's house by unknown woman) बंगल्याच्या सुरक्षा रक्षक केबीनच्या काचांवर महिलेने दगडफेक करत काही कळण्याच्या आत तिथून पळ काढला.

दरम्यान चव्हाण यांच्या बंगल्यावर दगडफेक झाल्याचे समजताच तिथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिस दगडफेक करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत. (Minister Ashok Chavan Maharashtra)

दगडफेक करणारी महिला माथेफिरू असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला तरी यामागे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानाजवळ पोलिस अधिक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्यासह पोलिसांचा ताफा पोचला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू आहे.

सध्या राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलनाची धग आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा ठपका विविध मराठा संघटनांकडून ठेवण्यात आला होता.

त्यातच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. अशा वातावरणात अशोक चव्हाण यांच्या बंगल्यावर दगडफेकीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com