राज्याचा कारभार आऊटसोर्सच्या हातात, मग सरकारचे अभिनंदन कसे करायचे?

सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आणि अधिकार प्रशांत निलावार, उद्योग गिरीश पवार, नगरविकास अजय अशर तर गृहनिर्माण विभागाशी संबंधित सर्व महत्वाचे निर्णय किर्तीकुमार केडिया नावाची व्यक्ती घेत आहेत.
Bjp Mla Ashish Shelar Speech News
Bjp Mla Ashish Shelar Speech News

औरंगाबाद: माझ सरकार, माझ शासन याचा राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख आला आहे, सरकारने खूप चांगल काम केलयं अस म्हणत विरोधकांनी देखील त्याच अभिनंदन करावं, अशी अपेक्षा त्यातून व्यक्त होतेयं. पण राज्याच्या अनेक महत्वाच्या खात्यांचे काम हे आऊटसोर्स करण्यात आले आहे, मंत्र्यांचे अधिकार या लोकांना देण्यात आले आहे, मग या सरकारचे अभिनंदन कसे करायचे? अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलतांना शेलार यांनी सार्वजनिक बांधकाम, उद्योग, गृहनिर्माण खात्याच्या कारभार व ते चालवत असलेल्या काही लोकांचा नावानिशी उल्लेख केला. तसेच ही लोक कोण आहेत, त्याचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ ते २० पीए कर्जाऊ घेतल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला.

शेलार म्हणाले, सध्या राज्याचा कारभार कोण चालवतयं असा प्रश्न पडावा असे प्रकार विविध खात्यांच्या बाबतीत सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम आणि अधिकार प्रशांत निलावार, उद्योग गिरीश पवार, नगरविकास अजय अशर तर गृहनिर्माण विभागाशी संबंधित सर्व महत्वाचे निर्णय किर्तीकुमार केडिया नावाची व्यक्ती घेत आहेत.

ही लोक कोण आहेत, त्यांना ही खाती आऊटसोर्स करण्यात आली आहेत का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे. एवढेच नाही तर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग ज्यांच्याकडे आहे ते उदय सामंत यांनी तर १५ ते २० पीए कर्जाऊ घेतले आहेत. जर अशा प्रकारे राज्याच्या महत्वाच्या खात्यांचा कारभार चालणार असले तर माझे शासन, माझे सरकार चांगले काम करतेय हे कसे मानायचे?

एमएमआरडीएचा आयुक्त जो आयएएस दर्जाचा असतो त्याची नियुक्ती देखील कंत्राटी पद्धतीने करण्यात येते यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? मराठवाडा आणि विदर्भाला विकास महामंडळाच्या माध्यमातून एक सुरक्षा कवच कायद्याने दिले गेले आहे. आमचे सहकारी सुधीर मुनगंटीवार यांनी या विकास महामंडळाची मागणी आणि निधी मागितला तर हा विषय गृहतिकावर ठेवला जातो, अशाने या भागातील जनतेला न्याय मिळेल का? असा सवाल देखील शेलार यांनी सभागृहात उपस्थित केला.

खाजगी हाॅस्पीटलकडून रुग्णांची लूट..

कोरोना काळात खाजगी रुग्णालांकडून गोर-गरीब रुग्णांची अक्षरशा लूट केली गेली. शासनाने दर नियंत्रण यंत्रणा राबवली पण ती सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला. दीड ते १४ लाखांपर्यंतची बील खाजगी रुग्णालयांकडून आकारली गेली. अनेक ठिकाणी रुग्ण दगावल्यानंतर बीलासाठी पाच पाच दिवस मृतदेह नातेवाईकांना दिले गेले नाही. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेती वीस पॅकेज अंतर्गत रुग्णांना लाभ मिळालाच नाही. २१ लाख ५५ हजार रुग्णांपैकी राज्यातील फक्त ६० हजार कोरोना रुग्णांना या योजनेतून उपचार मिळाले.

मुंबई महापालिके अंतर्गत ३ लाख रुग्णांपैकी फक्त २८७० कोरोनाग्रस्तांना या योजनेचा लाभ मिळाल्याचा आरोप करतांनाच कोरोना लस घेतांना देखील नियम डावलून महापौर, आमदार आणि खाजगी वित्त संस्थेच्या लोकांना ते आरोग्य सेवक असल्योचे सांगून देण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील शेलार यांनी केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात असे प्रकार घडल्याचे शेलार यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो तीनचे आरेतील कारशेड कांजुरमार्गला हलवण्याचा महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णया संदर्भात शेलार यांनी सरकारवर आरोप केला. आरेची जागा सरकारी असतांना आता कांजुरमार्गाच्या खाजगी जागेत कारशेड उभारण्यात येत आहे. या संदर्भात सरकारने नुकतेच एक शपथपत्र उच्च न्यायालयात सादर केले असून यात काजूरमार्गच्या खाजगी जागा मालकाला मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले आहे, असा दावा शेलार यांनी केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com