वाॅटर ग्रीडला माझ्या मतदारसंघातून सुरुवात, हा राजकीय आयुष्यातला मोठा क्षण..

औरंगाबाद ः मराठवाडा वाॅटर ग्रीड योजनेला टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्या टप्याची सुरूवात माझ्या पैठण मतदारसंघातील जायकवाडीपासून होणार आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. मंत्रीमंडळाचा हा निर्णय जेव्हा मतदारसंघात काल कळाला, तेव्हा लोकांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. माझ्या राजकीय आयुष्यातील हा सर्वात मोठा निर्णय आणि क्षण असल्याच्या भावना राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केल्या.
Minister Sandipan Bhumre News Aurangabad
Minister Sandipan Bhumre News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाडा वाॅटर ग्रीड योजनेला टप्याटप्याने सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्या टप्याची सुरूवात माझ्या पैठण मतदारसंघातील जायकवाडीपासून होणार आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. (Starting Water Grid from my constituency, this is a big moment in political life.) मंत्रीमंडळाचा हा निर्णय जेव्हा मतदारसंघात काल कळाला, तेव्हा लोकांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. माझ्या राजकीय आयुष्यातील हा सर्वात मोठा निर्णय आणि क्षण असल्याच्या भावना राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी व्यक्त केल्या.

पैठणच्या जायकवाडीपासून मराठवाडा वाॅटर ग्रीडच्या पहिल्या टप्याला मान्यता देऊन २८५ कोटींचा निधी मंजुर केल्यानंतर भुमरे यांनी आज औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. (Shivsena Minister Sandipan Bhumre) भुमरे म्हणाले, धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी टीका नेहमी केली जायची. राजकारणी म्हणून आम्हाला याचे नेहमीच वाईट वाटायचे. (Marathwada Water Grid Project) पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने वाॅटर ग्रीड याेजनेला मंजुरी देत त्याची सुरूवात माझ्या पैठण मतदारसंघापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे आता वर्षानुवर्ष होणारी टीका कमी होईल, त्याही पेक्षा घर तिथे नळ आणि गांव तिथे शुद्ध पाणी पोचेल याचा मला मोठा आनंद आहे. मी मंत्री असतांना माझ्या कार्यकाळात हे काम सुरू होते आहे, हे मी भाग्याचे समजतो. महाविकास आघाडी सरकारमधील सगळ्याच नेत्यांनी या कामाला पैठणमधून सुरूवात करण्यास परवानगी दिली, त्यांचे मी आभार मानतो.

मुख्यमंत्र्यांनी आमचे ऐकले..

गेल्या अनेक महिन्यापासून मराठवाडा वाॅटर ग्रीडचे काम सुरू व्हावे, आम्ही सगळे प्रयत्नशील होतो. सातत्याने दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्वाचा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकले आणि योजनेला टप्याटप्याने कार्यन्वित करण्याचा निर्णय घेतला.

येत्या आठवडाभरात पैठणमधील योजनेच्या कामाचे सर्वेक्षण सुरू होईल. ७०० किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनमधून हे पाणी ग्रीड करून गावागावांत पोहचले जाणार आहे. योजना मोठी असल्यामुळे ती पुर्ण होण्यासाठी तीन वर्ष लागतील असेही भुमरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Edited By : jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com