आरोग्य सेवेतील रिक्त पदांपैकी ५० टक्के भरण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू करा - Start the process of filling 50% of the vacancies in the health service in the district within a week | Politics Marathi News - Sarkarnama

आरोग्य सेवेतील रिक्त पदांपैकी ५० टक्के भरण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू करा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

भरतीची प्रक्रिया एका आठवड्यात सुरु करून सहा ते आठ आठवड्यात ती पूर्ण करावी असे आदेश दिले.

औरंगाबाद ः  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात सरकारी दवाखान्यांमध्ये रिक्त असलेल्या पदांच्या पन्नास टक्के पदे भरण्याची प्रक्रिया एका आठवड्यात सुरु करून सहा ते आठ आठवड्यात ती पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी राज्य शासनाला दिले. ( Bombay High Court Bench Aurangabad Order On Mp Imtiaz Jalils Pil) याचिकेवर पुढील सुनावणी १४ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यांमधील रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव यासंदर्भात उच्च न्यायालय खंडपीठात  जनहित याचिका दाखल केली आहे.

याचिकेनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे ८६८, औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागात ८३, औरंगाबाद जिल्हा परिषद आरोग्य विभागात ३३२, शासकीय कर्करोग रुग्णालयात १२२, केंद्र आणि राज्य शासन मान्यताप्राप्त विस्तररीत कर्करोग रुग्णालय येथे ३६४, सिव्हिल हॉस्पिटल चिकलठाणा येथे ६० तर शासकीय वैधकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे २१९ अशी पदे रिक्त आहेत. (Next Hearing On 14 the of June)

याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत शासनातर्फे म्हणणे मांडण्यात आले, की जिल्ह्यात अशी २०४८ पदे रिक्त असून, यापैकी पन्नास टक्के पदे तीन महिन्यांत भरण्यात येतील. (Medical And helath Departments Vacant post Recrupment Prosses Start In A Week, Says Cort to State Government) यावर खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना वाढीचा तीव्र वेग लक्षात घेता ही प्रक्रिया वेगाने व्हायला हवी, असे मत व्यक्त करीत रिक्त पदांपैकी पन्नास टक्के पदे भरतीची प्रक्रिया एका आठवड्यात सुरु करून सहा ते आठ आठवड्यात ती पूर्ण करावी असे आदेश दिले.

आजच्या या ऑनलाईन सुनावणीवेळी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्तिशः बाजू मांडली. राज्य शासनातर्फे ऍड. सुजित कार्लेकर तर जिल्हा परिषदेतर्फे ऍड. श्रीमंत मुंडे यांनी काम पाहिले.

हे ही वाचा ः अजित पवार यांनी थेट अदर पुनावालांना फोन लावला..पण?

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख