जायकवाडीच्या जलविद्युत केंद्राची दुरूस्ती करून वीज निर्मिती सुरु करा.. - Start power generation by repairing Jayakwadi hydropower station. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जायकवाडीच्या जलविद्युत केंद्राची दुरूस्ती करून वीज निर्मिती सुरु करा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 जुलै 2021

या केंद्रातून दररोज हजारो युनिट वीज निर्मिती होत असते. सदरिल केंद्र हे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मार्फत चालविण्यात येते.

औरंगाबाद ः हवामान खात्याने यावर्षीही चांगल्या पावसाचे अनुमान वर्तविले असल्यामुळे जायकवाडी येथील वीज निर्मिती केंद्राची तातडीने दुरुस्ती करून त्वरित हे वीज निर्मिती केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. (Start power generation by repairing Jayakwadi hydropower station)

दानवे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जायकवाडी धरणावर १२ मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत निर्मिती  केंद्र  १९८५-८६ पासुन आहे. (Shivsea Mla letter to Minister Jayant Patil)  याविद्युत केंद्राची  विशेषता म्हणजे  येथे  रिव्हरसिबल टर्बाईन  बसविलेले आहे.  त्यामुळे विद्युत निर्मिती नंतरचे पाणी वाया न जाता ते परत धरणात सोडले जाते.

या केंद्रातून दररोज हजारो युनिट वीज निर्मिती होत असते. सदरिल केंद्र हे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मार्फत चालविण्यात येते. परंतु सद्यस्थितीत हे  वीज निर्मिती केंद्र दुरूस्ती अभावी बंद आहे. (jayakwadi Dam Paithan, Aurangabad) परिणामी शासनाच्या  वीज निर्मितीचे  नुकसान होत आहे. पावसाळ्यात वाहुन जाणा-या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर वीज  निर्मिती होत असते.

२०१९ व २०२० मध्ये जायकवाडी धरणातुन ओव्हरफ्लोचे पाणी वाया गेले.  या दोन्ही वर्षी धरण  शंभर टक्के भरलेले होते. पंरतु वीज निर्मिती  केंद्र नादुरूस्त असल्यामुळे वर्षभर वीज निर्मिती करता आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी व जायकवाडी विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव, असल्याचेही दानवे यांनी पत्रात म्हटले आहे.

यावर्षी देखील हवामान खात्याने चागल्या पावसाचे अनुमान वर्तवविलेले असल्यामुळे सदरील वीज निर्मिती केंद्राची तातडीने दुरूस्ती करुन  वीज निर्मिती सुरू करावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. याबाबत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत झालेल्या चर्चेत वीज निर्मिती सुरु करण्याबाबत आश्वासन देण्यात आले असल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा ः औरंगाबादेतील प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख