मोक्षदा पाटील लोहमार्गच्या एसपी, तर औरंगाबाद ग्रामीणला निमित गोयल..

अमरावती ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची औरंगाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
मोक्षदा पाटील लोहमार्गच्या एसपी, तर औरंगाबाद ग्रामीणला निमित गोयल..
Aurangabad Police Transfer News

औरंगाबाद ः पोलिस दलात राज्यभरातील विविध संवर्गातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली औरंगाबाद लोहमार्ग अधीक्षकपदी तर पाटील यांच्या जागी निमित गोयल, तसेच शहर पोलिस दलातील मुख्यालयाच्या उपायुक्त मीना मकवाना यांची औरंगाबाद राज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. (SP of Mokshada Patil Lohmarg, while Nimit Goyal of Aurangabad Grameen.)

गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश निघाले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांची औरंगाबाद येथेच लोहमार्ग पोलिस अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे. ( Police Officers Transfer In Maharashtra)तर त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणून निमीत गोयल यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ते पदभार स्वाकीरणार असल्याची माहिती आहे.  

गोयल हे मुंबई शहर , सशस्त्र दलात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. या शिवाय शहर पोलिस दलातील उपायुक्त निकेश खाटमोडे, मीना मकवाना यांची देखील बदली करण्यात आली आहे. राज्यातील इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये अमरावती ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची औरंगाबादच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिक्षकपदी बदली करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रं. १३ चे समादेशक पवन बनसोडे यांची  औरंगाबाद ग्रामीणमध्ये पोलिस अप्पर अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

खाटमोडे मुंबईली, मकवाना गुप्तवार्ता विभागात..

शहर पोलिस दलातील उपायुक्त निकेश खाटमोटे पाटील यांची पोलिस अधिक्षक म्हणून फोर्स वन, युसीटीसी मुंबई येथे बदली झाली आहे. तर उपायुक्त मीना मकवाना यांची औरंगाबाद येथेच उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग येथे नियुक्ती झाली आहे. याशिवाय उस्मानाबादचे अप्पर पोलिस अधिक्षक संदीप पालवे यांची औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकात अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in