घाटीत तुटवडा निर्माण होताच, इम्तियाज जलील यांनी ट्रकभर सलाईन दिल्या..  - As soon as there was a shortage in the valley, Imtiaz Jalil gave a truckload of saline. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

घाटीत तुटवडा निर्माण होताच, इम्तियाज जलील यांनी ट्रकभर सलाईन दिल्या.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

घाटीतील सलाईनचा साठा अचानक संपला. गरिब रुग्णांना सलाईन बाहेरून आणावे लागत असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना मिळाली होती.

औरंगाबाद :शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी) येथे सलाईन बॉटल संपल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन सलाईनची व्यवस्था करावी लागत होती. याची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील यांनी तातडीने एक ट्रक भरून चार हजार सलाईन घाटीत दिले. खाजगी एजन्सीकडून खरेदी करण्यात आलेले हे सलाईनचे बाॅक्स इम्तियाज जलील यांनी स्वतः घाटी प्रशासनाकडे सुपुर्द केले.

घाटी अर्थात शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे केवळ मराठवाड्यातीलच नाही, तर खान्देश, विदर्भ या भागातील गोर-गरीब रुग्णांसाठी एक महत्वाचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. येथे गरिबांवर तातडीने व योग्य उपचार केले जातात. येथील डाॅक्टर, नर्स, कर्मचारी यांच्या परिश्रमाने आतापर्यंत लाखो रुग्णांना इथे जीवदान मिळाले आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवरील उपचाराचा सर्वाधिक भार देखील घाटीवरच आहे.

राज्यात लाॅकडाऊन आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचा फटका कधीकधी शासकीय रुग्णालयांना देखील बसतो. तो बसला आणि घाटीतील सलाईनचा साठा अचानक संपला. गरिब रुग्णांना सलाईन बाहेरून आणावे लागत असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांना मिळाली. त्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि काही तासांतच घाटी रुग्णालयासाठी चार हजार सलाईनचे बाॅक्स एका ट्रकमध्ये भरून पाठवून दिले.

दुपारी इम्तियाज जलील यांनी स्वतः ते घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अचानक सलाईनचा तुटवडा कसा निर्माण झाला याची देखील माहिती घेतली. तुर्तास रुग्णांना सलाईनची कमतरता भासू देऊ नका, आणखी काही इतर औषधी, इंजेक्शन पाहिजे असतील तर सांगा, त्याचीही व्यवस्था करू, असे  आश्वासन देखील इम्तियाज जलील यांनी डाॅक्टरांना दिले.

सलाईन कसे संपले, ते ट्रान्पोर्टमध्ये कुठे अडकले आहे का? की प्रशासनाकडून काही दिंरगाई झाली, याचा शोध आपण घेऊच, पण तुर्तास रुग्णांची गैैरसोय नको, म्हणून आपण चार हजार सलाईन घाटीला दिले असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख