पवार-गडकरी एकत्र येताच आमदार क्षीरसागरांनी महामार्गाचा प्रश्न सोडवून घेतला

शहरातून जाणाऱ्या १२ किलोमिटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांचा सुरुवातीपासून पाठपुरावा सुरू आहे.
Ncp Mla Meet- Nitin Gadkari, Sharad Pawar In dehli News
Ncp Mla Meet- Nitin Gadkari, Sharad Pawar In dehli News

बीड : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाले आणि शहरातून जाणाऱ्या १२ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचा प्रश्न उभा राहीला. परंतु, आता हा प्रश्नटी निकाली निघाला आहे. बुधवारी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी योगायोगाने एकत्र होते. (As soon as Pawar and Gadkari came together, MLA Kshirsagar solved the highway issue) याच वेळी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गडकरींकडे मुद्दा मांडला आणि प्रश्न फटक्यात मार्गी लागला.

पुर्वी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात होता. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे विस्तारीकरण झाले. त्यामुळे महामार्ग बाह्यवळण रस्ताद्वारे शहरापासून गेला. (Ncp Mla Sandip Kshirsagar, Beed) परिणामी कोल्हारवाडी बाह्यवळण रस्ता ते बार्शी नाका - छत्रपती शिवाजी महाराज चौक, जालना रोड मार्गे जिरेवाडी बाह्यवळण रस्ता या १२ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचे विस्तारीकरण, मजबूतीकरण, ड्रेनेज असा प्रश्न निर्माण झाला. या कामाला मंजूरी मिळावी म्हणून संदीप क्षीरसागर यांचा पाठपुरावा सुरु होता.  

जेष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. मात्र, या नूतनीकरणाच्या कामात काही तांत्रिक अडचणी असल्याने कामाला प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. दरम्यान, सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे देखील दिल्लीतच आहेत. हाच प्रश्न घेऊन संदीप क्षीरसागर दिल्लीत पोचले.

योगायोगाने पवार व गडकरी एकत्रच होते. खासदार सुप्रिया सुळेही बाजूला थांबून होत्या. संदीप क्षीरसागर यांनी पवारांच्या परवानगीने गडकरींकडे हा मुद्दा उपस्थित करताच गडकरींनी याला मंजूरी दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे पडलेला हा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगीतले. तरीही काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले.  

दरम्यान, शहरातील करपरा नदीपासून खापरपांगरी - पारगाव शिरस - साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय सीआरआयएफमधुन तीन कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मिळाला असून अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मिळाला आहे. २५ वर्षांपासूनचा बीड शहर व मतदार संघातील अनुषेश भरुन काढण्यासाठी प्रयत्नशिल असून निवडणुकीत दिलेली आश्वासने पुर्ण करणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले. या भेटीत मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक देखील उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com