हर्षवर्धन यांनी जालन्यातून लढण्याची इच्छा व्यक्त करताच संजना जाधव मैदानात..

सजना जाधव अचानक सक्रीय झाल्या आणि त्यांनी थेट पिशोर गाठत जाहीर कार्यक्रमाला हजेरी देखील लावली.
Sanjana Jadhav In Action News Aurangabad
Sanjana Jadhav In Action News Aurangabad

औरंगाबाद ः कन्नडचे माजी  आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक घोषणा केली. जालना लोकसभा मतदासंघात जाधव यांना शुभेच्छा देणारा फलक लागला आणि आपण इथून लोकसभा लढवावी, अशी जालन्याच्या जनतेची इच्छा आहे. याचा आपण सकारात्मक विचार करू, अशी घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी अगदी आनंदी होत सोशल मिडियाच्या माध्यमातून केली. (As soon as Harshvardhan announced to fight from Jalna, Sanjana Jadhav in the field)  या घोषणेला दोन दिवस उलटत नाही तोच सजना जाधव या मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले.

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील कचरा घंटा गाड्यांचे उद्धाटन संजना यांच्या हस्ते आज करण्यात आले. (Ex.Mla Harshavardhan Jadhav) विशेष म्हणजे यावेळी शिवेसना, भाजप, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षांचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (Sanjana Jadhav) गेल्या अनेक महिन्यांपासून संजना जाधव या राजकारण व सार्वजनिक कार्यक्रमापासून अलिप्त होत्या.

पण हर्षवर्धन यांनी थेट जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सजना जाधव अचानक सक्रीय झाल्या आणि त्यांनी थेट पिशोर गाठत जाहीर कार्यक्रमाला हजेरी देखील लावली. हा निव्वळ योगायोग नसून हर्षवर्धन यांच्या घोषणेला संजना यांनी दिलेले प्रत्युत्तर असल्याचे बोलले जाते.

काही महिन्यांपुर्वी झालेल्या ग्रामपंचयात निवडणुकीत हर्षवर्धन-आदित्य यांच्या पॅनलविरोधात संजना जाधव यांनी स्वतंत्र पॅनल उभे करत निवडूणक लढवली होती. या निवडणुकीत संजना यांच्या पॅनलला मर्यादित यश मिळाले असले तरी विरोधकांशी हातमिळवणी करत त्यांनी पिशोर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पद मिळवले होते. जाधव पिता-पुत्रांना संजना यांनी दिलेला हा पहिला दणका समजला जात होता.

त्या पोस्टरवरून थिणगी..

कालांतराने कोरोनाचे संकट आणि कौटुंबिक कारणामुळे संजना जाधव या राजकारण आणि सार्वजनिक कार्यक्रमापासून काहीशा दूर होत्या. दरम्यान लोकसभा आणि त्यांनतर झालेल्या विधानसभा अशा सलग दोन पराभवानंतर हर्षवर्धन जाधव यांनी नव्याने कन्नड मतदासंघात कामाला सुरूवात केली. खत, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न, पीक कर्ज असे विषय हाताळत ते रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांच्या सोबतीला ईशा झा या देखील होत्या.

हर्षवर्धन आणि इशा झा यांना तेजस्विनी जाधव यांचा देखील आशिर्वाद मिळाला, या दोघांना सांभाळून घ्या, असे आवाहन देखील एका मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी कन्नडवासियांना केले होते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रमात हर्षवर्धन- ईशा झा ही जोडी सोबत दिसायची. दरम्यान, १८ जून रोजी हर्षवर्धन जाधव यांचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाचे एक पोस्टर जालना शहरातील अंबड चौफुली चौकात दिसून आले.

या पोस्टरवर संसद आणि त्या समोर हर्षवर्धन जाधव यांचे छायाचित्र होते. शुभेच्छूक म्हणून ईशा झा यांचे नाव आणि फोटो होता. विशेष म्हणजे त्यावर जालना लोकसभा मतदारसंघ असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांना जालना लोकसभा मतदारसंघातून शुभेच्छा देत त्यांना २०२४ ची निवडणूक याच ठिकाणाहून लढण्याचे हे संकेत असल्याचा दावा जाधव यांनी केला.

हर्षवर्धन यांना सूचक इशारा..

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत आपल्याला खूप गहिवरून आले आहे, आपण तुमच्या मागणीचा नक्कीच विचार करू, असे म्हणत जालन्यातून लढण्याची इच्छा देखील बोलून दाखवली होती. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया देखील उमटल्या. पण हर्षवर्धन जाधव यांचा हा आनंद फारकाळ टिकेल असे वाटत नाही. कारण दोन दिवसानंतर लेगच संजना जाधव यांनी पिशोरमध्ये येत आपण अजूनही मैदान सोडलेले नाही हे दाखवून दिले.

पिशोर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सुरू करण्यात आलेल्या कचरा घंटा गाड्यांचे उद्धाटन संजना जाधव यांच्या हस्ते आज करण्यात आले. संजना जाधव यांची ही अचनाक झालेली एन्ट्री योगायोग निश्चित नसावा. विशेष म्हणजे शिवसेनेचे तालुका प्रमुख केतन काजे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या पद्धतीने संजना जाधव यांचे पिशोरमध्ये स्वागत झाले, ते पाहता हर्षवर्धन यांनी जालन्यात लूडबूड केली तर संजना त्याला कन्नडमधून आव्हान देतील असाच हा इशारा असल्याचे समजते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com