मग शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या योगींबरोबर काय करायला पाहिजे?

योगींबद्दल ठाकरे यांनी वापरलेली भाषा यासाठी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
मग शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या योगींबरोबर काय करायला पाहिजे?
Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल काल रत्नागिरी पोलीसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केल्यावर राणे अधिकच आक्रमक झाले.(So what to do with yogis who insult Shivaji Maharaj? Said, Shivsena Mla Ambadas Danve) भाजपने देखील उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करत त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून केलेली चपलेने मारण्याची भाषा योग्य आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावर आता शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी भाजपची ही मागणी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. (Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra) महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पायात चप्पल घालून हार घालणाऱ्या व त्यांचा अपमान करणाऱ्या योगींबरोबर काय करायला पाहिजे होते? याचा विचार महाराष्ट्रातील जनतेने करावा, असे म्हणत भाजपवर टीका केली.

राज्यात नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष भडकला आहे. जामीनावर सुटका झाल्यानंतर राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा शिवसेनेला डिवचले आहे. (Yogi Adityanath Chief Minister Uttar Pradesh) मी तुम्हाला सगळ्यांना पुरून उरलो असे सांगतानाच, तुम्हालाही घर आहे, मुलंबाळ आहेत, याचा विचार करा, अशी धमकी देखील शिवसेनेला दिली. यावरून राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नारायण राणे यांचे मुक्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे गुन्हा दाखल करून अटक करण्या इतके गंभीर नव्हते, असा दावा देखील राणे आणि भाजपकडून केला जातोय. यासाठी शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांबद्दल केलेली विधानं, वापरलेली भाषा याचे दाखले दिले जात आहेत.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चपलेने तोंड फोडावेसे वाटते, असे विधान केल्याच्या व्हिडिओ क्लीप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राणे यांच्या विधानाशी तुलना करून योगींबद्दल ठाकरे यांनी वापरलेली भाषा यासाठी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. यावर आमदार अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत भाजपच्या या मागणीची खिल्ली उडवली आहे.

महाराजांचा अपमान कसा सहन करणार?

दानवे म्हणाले, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्रात आले, तेव्हा त्यांनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घातला होता. उद्धव ठाकरे यांनी हाच संदर्भ देत या कृतीमुळे योगी यांचे त्यांच्याच पायातील चप्पलेने तोंड फोडावे असे वाटते, अशी टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान करणाऱ्या योगींना चप्पलेने मारू नये तर मग काय करावे? याचा विचार महाराष्ट्रातील जनतेनेच केला पाहिजे.

उद्धव ठाकरे यांचे जे भाषण भाजपकडून दाखवले जात आहे, त्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी ते कुठल्याही संवैधानिक पदावर नव्हते. त्यामुळे त्या प्रकरणात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी ही हास्यासपद असल्याचे सांगत दानवे यांनी खिल्ली उडवली.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in