मिरवणुकीला परवनागी नाकारल्याच्या रागातून शिख तरूणांचा पोलिसांवर हल्लाबोल

पोलिस अधिक्षकांसह काही अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. दगडफेकीत सहा पोलिसकर्मचारी देखील जखमी झाले आहेत.
Nanded Police Attack News
Nanded Police Attack News

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडात शिख समाजाकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणुकीला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. या रागातून मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या शिख तरूणांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आक्रमक झालेल्या जमावाने थेट पोलिसांच्या वाहनांवरच दगडफेक करत हल्ला चढवला. यात पोलिस अधिक्षकांसह काही अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात  आल्या. दगडफेकीत सहा पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वातावरण तणावपुर्ण आहे.

शिख समाजात होळी सणाचे मोठे महत्व आहे.  या निमित्ताने दरवर्षी हल्लोबल मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात येते. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा असल्यामुळे यंदाही मिरवणुक काढण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी शिख समाजाच्या वतीने करण्यात येत होती. मात्र राज्यात व नांदेडमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे लाॅकडाऊन जारी करण्यात आला आहे. या शिवाय जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांनी ठल्याही प्रकारच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

मात्र हे आदेश धुडकावत शहरातून सायंकाळी सहावाजेच्या सुमारास हल्लाबोल मिरवणुक काढण्यात आली. अचनाक मिरवणूकीतील काही तरूण आक्रमक झाले आणि मिरवणुकीला परवानगी नाकारल्याच्या रागातून त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांवरच हल्ला चढवला. पोलिस आणि त्यांच्या वाहनांवर तुफान दगडफेक करण्या्त आली. जमाव अधिक आक्रमक होत असल्याने पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण जमावाने त्याला न जुमानता पोलिस अधीक्षकांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाय वाहनांना लक्ष करत प्रचंड तोडफोड केली. या हल्यात सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

बॅरिकेड तोडले, वाहनांची हवा सोडली

संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शहरात या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण असून पोलिसांनी  हल्लेखोरांची धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर उलट या तरुणांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला.

 हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. या हल्ल्यात पोलिस अधिक्षकांचे अंगरक्षक  दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या हल्ल्यातून पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय  कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले हे थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या भागात तणावाचे वातावरण असून पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com