शिवसेनेची मदत थेट बांधावर, राज्यमंत्री सत्तार यांच्याकडून मतदारसंघात किराणा किटचे वाटप - Shiv Sena's help directly on the Farmer, distribution of kits in the constituency | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

शिवसेनेची मदत थेट बांधावर, राज्यमंत्री सत्तार यांच्याकडून मतदारसंघात किराणा किटचे वाटप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोरगरिब जनतेसाठी मोफत शिवभोजन थाली, रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाले, निराधार महिला व इतरांना आर्थिक मदत देखील जाहीर केली.

सिल्लोड : सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तब्बल ४० हजार किराणा सामन व जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटण्याचा संकल्प केला आहे. ही मदत खेड्या, पाड्यात, वाडी, वस्ती, तांड्यावर पोहचवण्यात येत आहे. विशेष म्हणजे एकही गरजू मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शिवसैनिक थेट शेताच्या बांधावर जाऊन मदत पोहचवत आहेत.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आणि ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्ण संख्या चिंताजनक आहे. राज्य सरकारने हा धोका कमी व्हावा, कोरोनाची साखळी तुटावी यासाठी राज्यात व जिल्ह्यात देखील संचारबंदी व कठोर निर्बंध लागू केले आहेत. परंतु या काळात हातावर पोट असणाऱ्या, गोरगरिबांचे अन्न-पाण्यावाचून हाल होऊ नये याची काळजी देखील सरकार वाहत आहे.

राज्यात संचारबंदी व निर्बंध लागू करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोरगरिब जनतेसाठी मोफत शिवभोजन थाली, रिक्षाचालक, भाजी विक्रेता, फेरीवाले, निराधार महिला व इतरांना आर्थिक मदत देखील जाहीर केली. सरकारमधील विशेषतः शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांना त्यांनी जनतेची मदत करा, असे आदेश देखील दिले आहेत.

महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात चाळीस हजार किराणा सामान इतर जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप सुरू केले आहे. शहर व ग्रामीण भागात याचा लाभ अनेक गरिब लाोकांना होत आहे. मदतीपासून एकही गरजू वंचित राहू नये, यासाठी शिवसैनिक थेट शेताच्या बांधावर जाऊन लोकांना मदत करतांना दिसत  आहेत.

मतदारसंघातील शिवना गावाच्या परिसरात शिवसैनिकांनी थेट शेतातील बांधावर जावून शेत मजुरांना किराणा किट व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.  आतापर्यंत मतदार संघातील ६० टक्के गावांत ही मदत पोहचवण्यात आल्याचे व लवकरच उर्वरित गावांत देखील मदत देणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल यांनी कळवले आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख