शिवसेनेचा वर्धापनदिन अन् खैरे-दानवेंचा छत्तीसचा आकडा कायम..

खैरेंशिवाय मातोश्रीवर थेट संपर्क आणि भेट मिळू लागल्याने दानवे यांनी जिल्ह्यात देखील महापालिका, जिल्हापरिषद, विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीपासून ते मुलाखतीपर्यंतच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग वाढवला.
Shivsena Leader khaire-Danve Contrevercy News Aurangabad
Shivsena Leader khaire-Danve Contrevercy News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा आज ३६ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ज्या गुलमंडीवर शिवसेना शाखेचा पहिला फलक लावला, त्या ठिकाणी ध्वजारोहण केले. (Shiv Sena's anniversary and Khaire-Danve's number 36 remains) यावेळी शिवसेनेचे आमदार, पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षीही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांची अनुपस्थिती खटकली.

गेल्या काही वर्षांपासून दानवे हे क्रांतीचौकात स्वंतत्रपणे ध्वजारोहण करून वर्धापनदिन साजरा करतात. त्यामुळे शिवसेना शाखेच्या ३६ व्या वर्धापनदिनीही खैरे-दानवे यांच्यातील छत्तीसचा आकडा कायम असल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणावर चंद्रकांत खैरे यांचे वर्चस्व होते. (Chandrakant Khaire dominated the Shiv Sena politics in Aurangabad district.) खैरे म्हणतील ती पुर्वदिशा असायची. शिवसेनेचे उपशहरप्रमुख, नगरसेवक,आमदार, मंत्री व सलग चारवेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा विक्रम् आणि मातोश्रीवर वजन असल्यामुळे खैरेंना दुखावण्याची किंवा त्यांना बायपास करण्याची हिमंत गेल्या २५-३० वर्षात कुणी दाखवली नव्हती. पण अंबादास दानवे यांनी जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि जिल्ह्यात शिवसेनेमध्ये दुसरे सत्ताकेंद्र निर्माण झाल्याचे दिसून आले.

सुरुवातीला दानवे यांनी सावध पावित्रा घेत खैरेंशी जुळवून घेत आपली वाटचाल सुरू ठेवली. (On the strength of his organizational skills, Danve caught the attention of Chhota Thackeray.) परंतु शिवसेनाप्रमुख थकल्यानंतर पक्षाची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती आली आणि संघटन कौशल्याच्या जोरावर दानवे यांनी छोट्या ठाकरेंचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. उद्धव ठाकरे यांचा कुठलाच शब्द खाली न पडू देता त्यांच्या नजरेत भरेल, अशी आंदोलन, संघटनेची नव्याने बांधणी, निवडणूक यंत्रणा राबवत दानवे यांनी उद्धव ठाकरेंचे मन जिंकले.

खैरेंशिवाय मातोश्रीवर थेट संपर्क आणि भेट मिळू लागल्याने दानवे यांनी जिल्ह्यात देखील महापालिका, जिल्हापरिषद, विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीपासून ते मुलाखतीपर्यंतच्या प्रक्रियेत सक्रीय सहभाग वाढवला. (Shiv Sena also witnessed other such struggles against Marathas.) खैरे खासदार असल्याने ते दिल्ली आणि मुंबईत असल्यामुळे सुरूवातीला त्यांनी देखील याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. पुढे शिवसेनेत मराठा विरुद्ध इतर असा संघर्ष देखील पहायला मिळाला.

खैरेंवर थेट टीका नाहीच..

रामदास कदम हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना हे प्रकर्षाणे जाणवले. अनेक निर्णय हे खैरेंना डावलून होऊ लागले आणि तिथूनच खैरे विरुद्ध दानवे संघर्षाला सुरूवात झाली. अगदी खैरेंकडून दानवे यांची काॅलर धरण्याचा प्रकार असो की मग त्यांना मारण्याची धमकी. या सगळ्या प्रकारावर दानवे यांनी मात्र नेहमीच सावध भूमिका घेत मुंबईतील वरिष्ठ नेत्यांची सहानूभुती मिळवली. खैरे हे आमचे नेते आहेत, घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच, आमच्यात कुठलाही वाद नाही, हे दानवे यांचे प्रसारमाध्यांना ठरलेले उत्तर असायचे. पडद्यामागे मात्र खैरे यांना असलेला विरोध दानवे प्रखरपणे मांडायचे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा उमेदवारीचा विषय निघाला, तेव्हा दानवे यांनी इच्छा व्यक्त करत पक्षाकडे उमेदवारी मागितली, तेव्हापासून तर खैरे-दानवे यांच्यात अनेकदा खटके उडाले. या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वादामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांची मात्र गोची व्हायची. तर अनेकांनी दोन्ही नेत्यांकडे हजेरी लावत कुणाचाही रोष नको ही भूमिका स्वीकारली. दानवे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी पक्षाने पाचव्यांदा खैरे यांनाच उमेदवारी दिली, मात्र ती देतांना आता ही शेवटची संधी असा सूचक संदेश देखील दिला.

दरम्यान, अंबादास दानवे यांचीही लाॅटरी लागली, लोकसभेची उमेदवारी मागणाऱ्या दानवेंना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची उमेदवारी दिली. केवळ उमेदवारीच दिली नाही, तर त्यांना निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे, यांच्यामार्फत रसदही पुरवली. दानवेंचे नशीब फळफळले आणि ते विक्रमी मतांनी निवडून आले. दानवे आमदार झाले, तर लोकसभा निवडणुकीत खैरेंचा थोडक्यात पराभव झाला.

पराभव, ठाकरेंवरील टीकेने बॅकफुटवर..

राज्यसभेवर संधी मिळेल या आशेवर असलेल्या खैरेंची पक्षाने निराशा केली आणि प्रियंका चतुर्वेदी या नव्या महिलेला संधी दिली. त्यानंतर संयम सुटलेल्या खैरेनी पहिल्यांदा ठाकरेंबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. पुढे त्यांना याची मोठी किंमतही मोजावी लागली. या सगळ्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा दानवे यांनी उचलला. २०२४ मध्ये लोकसभेचा उमेदवार मीच हे चित्र जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात बिंबवण्यात देखील दानवे यशस्वी ठरले आहेत.

तिकडे खैरे यांनी पराभवाचे दुःख बाजूला सारत स्वतःला पक्ष कार्यात झोकून दिले. पक्ष पुन्हा एकदा आपल्या संधी देईल या विश्वासातून खैरे यांनी देखील २०२४ ची तयारी सुरू केली आहे. जनसंपर्क वाढवत ते दररोज जिल्ह्याचे दौरे करतांना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात देखील खैरे-दानवे यांच्या संघर्ष झडणार हे उघड आहे.

मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा ३६ वा वर्धापनदिन साजरा होत असतांना खैरे-दानवे यांच्यातील संघर्ष प्रकर्षाने जाणवला तो गुलमंडी येथील ध्वजारोहण कार्यक्रमाला दानवे यांच्या गैरहजेरीमुळे. याशिवाय जिल्ह्यात या दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र मोहिमा आणि वर्धापनदिनाचे कार्यक्रम देखील सुरू आहेत.

मी मुंबईत, आमच्यात वाद नाही..

शिवसेना शाखेच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित ध्वजारोहणाला दानवे उपस्थित नव्हते. या संदर्भात त्यांना विचारले असता, मी मुंबईत आहे. वर्धापनदिना निमित्त पालकमंत्री सुभाष देसाई हे जिल्ह्यातील शिवसैनिकांशी व्हर्च्युल पद्धतीने संवाद साधणार आहेत. त्याची तयारी करण्यासाठीच मी काल मुंबईत आलो आहे. माझ्या आणि खैरेंच्या वादाच्या बातम्या या आता नित्याच्याच झाल्या आहेत, त्यात काही नवे नाही. पण आमच्यात कुठलाच वाद नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com