शिवसेना खासदाराने उभारले १२५ बेडचे कोविड सेंटर; मोफत उपचार देणार.. - Shiv Sena MP erected 125 bed covid center | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

शिवसेना खासदाराने उभारले १२५ बेडचे कोविड सेंटर; मोफत उपचार देणार..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 एप्रिल 2021

येथे येणाऱ्या रुग्णावर अगदी मोफत उपचार करण्यात येणार आहेत. औषधापासुन सर्व खर्च हे कोवीड सेंटरच्या वतीनेच करण्यात येणार आहे

उस्मानाबाद ः राज्यात विशेषतः मराठवाड्यात कोरोनाचे संकट वाढले आहे. संसर्गाचे प्रमाण आणि मृतांची संख्या पाहता कोरोना सेंटर व रुग्णालयांची गरज पाहता शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शहरात १२५ बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. राज्य, केंद्र सरकार आपल्यापरीने कोरोनाशी मुकाबला करत आहे, मात्र सामाजिक बांधिलकी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही शिकवण यातून प्रेरणा घेत हा प्रयत्न केला असल्याचे राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्याप्रमाणेच आता उस्मानाबादमध्ये देखील कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. त्यातुलनेत आरोग्य सुविधा, बेड, औषधी यांची कमतरता पाहता लोकप्रतिनिधींनी ेदेशील मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन कोविड सेंटर सुरू केली आहेत. उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमप्रमकाश राजेनिंबाळकर यांनी देखील पवनराजे काँम्प्लेक्स येथील समर्थ मंगल कार्यालयात १२५ बेडचे अद्यावत कोविड सेंटर सुरू केले.

शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन व इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सहकार्याने हे जम्बो कोवीड सेंटर आजपासुन रुग्णांच्या सेवेसाठी सूरु करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या गृहित धरुन व ग्रामीण भागात वाढत असलेल्या रुग्णांचे प्रमाण पाहता त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत हा उद्देश घेऊन हे कोवीड सेंटर सूरु करण्यात आल्याची माहिती राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

शिवसेनेने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले आहे. 80 टक्के समाजकारणाचे सुत्र मानुन कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत व्हावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. येथील उपचारासाठी आयएमएच्या तज्ञ डॉक्टराचे सहकार्य लाभले असुन रुग्णांना येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे ओमराजे यांनी सांगितले.

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता भासत असल्याने सव्वाशे बेड पैकी पन्नास बेडला ऑक्सीजनची सुविधा देण्यात आली आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण दुर करण्यासाठी हे कोवीड सेंटर अधिक उपयोगाची ठरणार आहे. येथे येणाऱ्या रुग्णावर अगदी मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

औषधापासुन सर्व खर्च हे कोवीड सेंटरच्या वतीनेच करण्यात येणार आहे. शहरात तसेच तालुक्यात असलेल्या रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ झाली असुन अजुनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे, त्याचा विचार करता हे कोवीड सेंटर सामान्य नागरीकांसाठी मोठा आधार ठरेल असा विश्वासही ओमराजे यांनी व्यक्त केला.

कोवीड सेंटरच्या उभारणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर व आयएमएचे अध्यक्ष डॉ. सचिन देशमुख यांनी सहकार्य केल्याचे ओमराजे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख