शिवसेना आमदाराची आता सुदृढ मतदारसंघासाठी ॲन्टी कोरोना मोहिम..

कोरोनाशी लढतांना नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे हा ही मोहिम हाती घेण्यामागचा मुळ उद्देश आहे. प्रत्येक घरातील व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राहूल पाटील यांनी सांगितले.
rahul patil distribute medicein and mask news
rahul patil distribute medicein and mask news

परभणीः शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपला मतदारसंघ पाणीदार करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्यानंतर आता कोरोनामुक्त आणि सुदृढ मतदारसंघासाठी ॲन्टी कोरोना मोहिम हाती घेतली आहे. या अतंर्गत मतदारसंघातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्यांना कोरोनाच्या संकटापासून दूर ठेवण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम ३०‘ गोळ्या व त्यासोबतच कापडी मास्क वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

मतदार संघातील नागरिकांच्या सातत्याने संपर्कात राहून पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रम रावबत गेल्या सहा वर्षात अनेक समस्या सोडवण्यात यश मिळवले. पाणी टंचाई असो की शेतीच्या सिंचनचा प्रश्न, आपल्या पाठपुराव्याने त्यांनी ते धसास लावले.  पावसाचे वाहून जाणारे पाणी, त्यामुळे शेतीच्या पाण्याचा निर्माण झालेला प्रश्न राहुल पाटील यांनी योग्य पध्दतीने हाताळत मार्गी लावला होता.

त्यासाठी विद्यापीठ परिसरातून वाहणाऱ्या पिंगळगढ नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेवून या भागात पडणारे पावसाचे पाणी याच भागात अडवून ठेवले. त्यामुळे दोन वर्षापासून उन्हाळ्यात देखील या भागात पाण्याची टंचाई फारशी जाणवली नाही.

पाणीदार मतदार संघ या उपक्रमा अंतर्गत त्यांनी केवळ पिंगळगढ नालाच नाही तर इतर भागात देखील खोलीकरण आणि रुंदीकरणाची अनेक कामे हाती घेत पाण्याचा प्रश्न सोडवला. जिथे संकट तिथे शिवसेना खंबीर या शब्दाला जागत त्यांनी मार्चपासून राज्यात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या संकटाचाही सामना केला.

लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्या अभावी सर्वसामान्याचे होणारे हाल आणि वाहतूकीची सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांचा पडून राहत असेलला भाजीपाला यावर देखील पाटील यांनी योग्य मार्ग काढत दोघांचीही गरज भागवली होती. धान्याच्या किटसह इतर जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप, आठवडाभर पुरेल ऐवढा भाजीपाला व फळे थेट लोकांच्या घरात पोहचविण्याचे काम देखील त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. 

आता लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर लोकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी त्यांनी ‘अॅन्टी कोरोना‘ मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या 'अर्सेनिक अल्बम 30' या होमिओपॅथीक गोळ्याचे वाटप सुरु केले आहे.

पहिल्या टप्प्यात शहरातील प्रत्येक वार्डनिहाय शिबीर आयोजित करून या गोळ्याचे वाटप केले जाणार आहे. त्याच बरोबर कापडी मास्कचे देखील वाटप केले जात आहे. कोरोनाशी लढतांना नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे हा ही मोहिम हाती घेण्यामागचा मुळ उद्देश आहे. प्रत्येक घरातील व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राहूल पाटील यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com