कोरोना झालेल्या कार्यकर्त्याला धीर देण्यासाठी शिवसेना आमदार थेट रुग्णालयात

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर शिवसैनिक मार्गक्रमण करतांना दिसतात.
Shivsena Mla Udaysing Rajuput- Visit Corona Hospital News Aurangabad
Shivsena Mla Udaysing Rajuput- Visit Corona Hospital News Aurangabad

औरंगाबाद ः मतदारसंघातील सच्चा कार्यकर्ता कोरोना झाल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत होता. त्याची आॅक्सीजन पातळी खालवल्याचे कळताच कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत थेट रुग्णालयात दाखल झाले. पीपीई कीट व सर्व काळजी घेत त्यांनी थेट वार्डात जाऊन कार्यकर्त्याला धीर दिला. `घाबरू नको, हिमंत धर, मी तुला काही होऊ देणार नाही, आपण तुला दुसऱ्या हाॅस्पीटलला घेऊन जात आहोत, तु काळजी करू नको,` अशा शब्दांत राजपूत यांनी त्या कार्यकर्त्याला बळ दिले.

डाॅक्टरांशी चर्चा केली, तातडीने अॅम्बयुन्स मागवली आणि त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. चाळीस पर्यंत खाली घसरलेली आॅक्जीन पातळी आता ८५ पर्यंत आली. आमदार राजपूत यांनी केलेल्या धावपळीला निश्चितच यश मिळेल आणि कार्यकर्ता ठणठणीत बरा होईल, अशी असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर शिवसैनिक मार्गक्रमण करतांना दिसतात. नैसर्गिंक संकट असो की एखादी दुर्घटना शिवसेना आणि शिवसैनिक तिथे असतोच हे चित्र महाराष्ट्रात अनेकदा पहायला मिळाले.

सध्या कोरोनाने जिल्ह्यात व राज्यात थैमान घातले आहे. अनेकांना या महामारीने गिळंकृत केले, तर काही मरणाच्या दारातून परत आलेत. सामान्य कार्यकर्ता ही कुठल्याही लोकप्रतिनिधीची ताकद असते, त्यामुळे कार्यकर्त्यांवर जीवपाड प्रेम करणारे अनेक नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी पहायला मिळतात.

अशाच एका जीवापाड प्रेम असलेल्या कार्यकर्त्यासाठी शिवसेनेचा एक आमदार थेट कोरोना वार्डात जाऊन त्याचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असलल्याचे दिसून आले. कन्नडचे शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांच्या मतदारसंघातील आंबा तांडा येथील कपूरचंद राठोड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आठवडाभरापुर्वी कोरोनावर उपचार घेण्यासाठी कन्नड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. परंतु त्याची प्रकृती गंभीर होत असल्याने संबंधित डाॅक्टरांनी त्याला औरंगाबाद येथे जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) दाखल करण्यास सांगितले.

गेल्या सहा दिवसांपासून या रूग्णावर जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात उपचार सुरू आहेत. आज अचानक त्याची आॅक्सीजन पातळी खालवली. ४५-४० पर्यंत ती खालवल्याचे सांगितले जाते. याची माहिती कळताच आमदार उदयसिंह राठोड यांनी तातडीने जिल्हा रुग्णायालकडे धाव घेतली. डाॅक्टरांशी चर्चा करून त्यांनी अंगावर पीपीईकीट चढवले आणि थेट वार्डात गेले. आपल्या कार्यकर्त्याची अवस्था पाहून क्षणभर राजपूत हे देखील हळवे झाले. पण स्वतःला सावरत त्यांनी कपूरचंद राठोड यांच्यांशी थेट संवाद साधला.

प्रकृतीत सुधारणा..

`कपूर तू घाबरू नको, हिमंत धर, मी तुला काही होऊ देणार नाही, हिंमतीने लढू, काळजी करू नको. मी तूला दुसऱ्या हाॅस्पीटलमध्ये घेऊन जोतोय. तु फक्त धीर धर, तु चागंला होशील,` अशा धीर आणि आधार उदयसिंह राजपूत हे त्याला व त्याच्या कुटुंबियाला देत होते. तिथे उपस्थित डाॅक्टरांशी चर्चा करून राजपूत यांनी ताडीने सदर रुग्णाला खाजगी रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेतला. विशेष अॅम्बयूलन्सची व्यवस्था केली आणि अवघ्या काही मिनिटात कपूरचंद राठोड याला खाजगी रुग्णालयात हलवले.

तिथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले, खालवलेली आॅक्सीजन पातळी वाढवण्यासाठीची सर्व प्रकारची औषधी दिली गेली आणि काही तासांत ४५ पर्यंत घसरलेली आॅक्सीजन पातळी ८५ पर्यंत वाढली. अद्यापही पुर्णपणे धोका टळलेला नसला तरी कार्यकर्त्यासाठी आमदारांनी केलेली धावपळ यशस्वी होतांना दिसते आहे. माझा कार्यकर्ता ठणठणीत बरा होऊन, लवकरच घरी परतेल, असा विश्वास उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com