शिवसेनेला भाजपचे हिंदुत्व नकोय, म्हणून दडपशाही..

आम्हाला नोटीसा पाठवून, गुन्हे दाखल केल्यानंतर अजूनही पोलिसांचे फोन येत आहेत. तुम्ही कुठे आहात याची विचारणा केली जाते. म्हणजे घरातही बसू द्यायचे नाही आणि बाहेरही पडू द्यायचे नाही अशी दडपशाही सरकारकडून सुरू आहे. आम्ही याचा निषेध तर करतोच पण या दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचेही केणेकेर यांनी सांगितले
bjp angry because fir fie against him by police news
bjp angry because fir fie against him by police news

औरंगाबाद ः कुठे बाबरी मशीद पाडल्यानंतर ही माझ्या शिवसैनिकांनी पाडली आहे, मला त्याचा अभिमान आहे असे छातीठोकपणे सांगणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आणि कुठे रामाचे पुजन केले म्हणून हिंदुत्ववादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे खरे होते, तर उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी आहे. शिवसेनेला भाजपचे हिंदुत्व नकोय, म्हणूनच राज्यात अशा प्रकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

अयोध्येत राम मंदिराच्या भुमीपूजनाचा सोहळा पार पडत असतांना राज्याभरासह औरंगाबादेत भाजपच्या वतीने ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजून करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी रामाचे पुजन व जल्लोष करण्यास परवानगी नाकारली होती.

परंतु भाजपने रामाचे पुजन करत पेढे, लाडू वाटून राम मंदिर भुमीपूजनाचा आनंद साजरा केला. या प्रकरणी पोलीसांनी काल भाजपच्या शहर-जिल्हाध्यक्षांसह पंधरा कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. या कारवाईने संतापलेल्या भाजपने आज पत्रकार परिषद घेऊन या कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

पत्रकारांशी बोलतांना संजय केणेकर म्हणाले, शिवसेनेला इच्छा असूनही राम जन्मभूमी येथे होत असलेल्या राम मंदिर निर्माण भुमीपूजनाचा आनंद साजरा करता आला नाही. हिंदुत्ववादी भूमिका सोडून शिवसेना ज्या पक्षांशी त्यांचे विचार कधीच जुळले नाही, त्यांच्या सोबत सत्तेत जाऊन बसली आहे.

त्यामुळे संपुर्ण देश जेव्हा चौकात, रस्त्यावर, आपापल्या भागाता रामाचे पुजन करून राम मंदिर निर्माणाच्या भुमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा करत होता. पण शिवसेनेच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना आपल्या घरातही पूजन करता आले नाही. उलट आम्ही रस्त्यावर उतरून रामाचे पूजन केले, लाखो लोकांच्या भावनांचा सन्मान केला तर आमच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनीच पोलिसांना फोन करून गुन्हे दाखल करायला लावले.

राम जन्भुमीवर रामाचे मंदिर व्हावे ही देशभरासह जगातील कोट्यावधी रामभक्तांची इच्छा काल अयोध्येतील भुमीपूजनाने पुर्ण झाली. जगभरातील ४८ देशांमध्ये या ऐतिहासिक घटनेचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परंतु स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेला त्यांच्या घरात देखील रामाचे पुजन करता आले नाही ही शोकांतिका आहे.

शिवसेनेने राम पुजनाचे फोटो दाखववावे..

सत्तेसाठी हिंदुत्व सोडून ज्या पक्षांशी कधीच विचार जुळले नाही त्यांच्या सोबत सत्तेत गेल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. राज्यात कुठेही शिवसेनेने रामाचे पुजन केले याचे फोटो दाखवा असे आवाहन करतांनाच शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असून त्यांना भाजपचे हिंदुत्व नको आहे, असा आरोपही केणेकर यांनी यावेळी केला.

आम्हाला नोटीसा पाठवून, गुन्हे दाखल केल्यानंतर अजूनही पोलिसांचे फोन येत आहेत. तुम्ही कुठे आहात याची विचारणा केली जाते. म्हणजे घरातही बसू द्यायचे नाही आणि बाहेरही पडू द्यायचे नाही अशी दडपशाही सरकारकडून सुरू आहे.

आम्ही याचा निषेध तर करतोच पण या दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचेही केणेकेर यांनी सांगितले. रामाच्या पुजनापासून उद्धव ठाकरे यांचे सरकार आम्हाला रोखत असेल तर मग राज्यात निजामाचे राज्य आहे का? असा सवाल आमदार अतुल सावे यांनी देखील पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com