शिवसेना-भाजप युती होवो की न होवो; दानवे-सत्तारांची मात्र झाली!

उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या विधानानंतर सध्या दानवे-सत्तार ही जोडी चांगलीच फाॅर्मात आली आहे.
raosaheb danve -Abdul Sattar news Aurangabad
raosaheb danve -Abdul Sattar news Aurangabad

औरंगाबाद ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादेतील एका विधानाने शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षातील नेते, लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. युती होणार, पारंपारिक मित्र पण दुरावलेले परत एकदा गळ्यात गळे घालणार असे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगवले जात आहे. (Shiv Sena-BJP alliance or not; However, the Danves and the Sattars did!) विशेष म्हणजे ज्यांना युतीचा निर्णय घेण्याचा काडीमात्र अधिकार नाही, असे दोन्ही बाजूचे नेते यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. 

या पैकीच दोन म्हणजे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे. सासुरवाडी शेजारी शेजारी, मतदरासंघही एकच त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये आधीपासूनच गूळपीठ आहे. (Chief Minister Uddhav Thackeray) निवडणुका आल्या की मात्र हे दोघे एकमेकांवर असे धावून जातात जणू काही आता युद्धच करणार आहेत. (Central railway Satate Minister Raosaheb Danve) पण हे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठीच. पडद्यामागे मात्र लोकसभेला तू मला मदत कर, विधानसभेला मी तुला असे यांचे गेल्या पंधरा-वीस वर्षापासूनचे धोरण राहिलेले आहे. 

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या विधानानंतर सध्या दानवे-सत्तार ही जोडी चांगलीच फाॅर्मात आली आहे. (State Minister Abdul Sattar) तिकडे राज्य पातळीवर आपल्याच पक्षाचे नेते काय बोलतातयेत, काय भूमिका मांडतायेत याकडे दोघांचेही लक्ष नाही. जणू आता युतीचा निर्णय आम्ही दोघेच घेणार या थाटात ही जोडी सध्या वावरतांना दिसते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमान औरंगाबादेतून मुंबईकडे झेपावत नाही तोच, अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे पुन्हा एकत्र आले. 

एकत्रित भोजन..

सत्तार थेट दानवेंच्या औरंगाबादेतील बंगल्यात गेले. तिथे या दोघांनीही प्रसार माध्यमांचे चांगलेच मनोरंजन केले. युतीसाठी मला मध्यस्ती करायला सांगितले तर मी नक्की करीन, असेही सत्तार यांनी सांगून टाकले. यावेळी दोघांनी काही जुन्या गोष्टी पुन्हा उगाळून सांगितल्या. यात सत्तार यांच्या डोक्यावरील टोपी, दानवेंनी विधानसभेला मला दगा दिला वगैरे वगैरे. काही दिवसांपुर्वीच अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे राजकारण घातक असल्याची टीका केली होती. 

लोकसभा निवडणूक आली की ते पाया पडतात, निवडणूक झाली की लाथा मारतात असा आरोप त्यांनी केला होता. तर शिवसेनेच्या संपर्क मोहिमेत सत्तार यांनी गाव तिथे शिवसेना शाखा उभारण्याचा सपाटा लावला तेव्हा, या शिवसेनेच्या शाखा नाही, तर सत्तार यांच्या शाखा असल्याचे दानवे यांनी म्हटले होते. तर हे असे दोघांचे अधून मधून सुरूच असते. याची आता दोघांच्याही समर्थकांना सवय झाली आहे.

तर उद्धव ठाकरेंचे विमान मुंबईला उडाल्यानंतर दानवे यांच्या बंगल्यात सत्तार-दानवे यांनी भरपूर मनोरंजन केल्यावर एकत्रित भोजन केले. अठरा महिन्यांनी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत, याचा आवर्जून उल्लेख सत्तार यांनी केला. त्यामुळे शिवसेना-भाजपचे ताणले गेलेले संबंध, सध्या सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, ईडापीडा हे सगळं विसरून नेते एकत्रित केव्हा येतील हे तर काळच ठरवेल. पण दानवे आणि सत्तार हे फक्त एकत्र आलेच नाही, तर एकत्र जेवले देखील हे ही नसे थोडके..

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com