शिवसंपर्क मोहिमे थेट शेताच्या बांधावर; सत्तारांचा मिरची उत्पादकांशी संवाद.. - Shiv Sampark campaigns directly on the farm Farm; Sattar interaction with chilli growers jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसंपर्क मोहिमे थेट शेताच्या बांधावर; सत्तारांचा मिरची उत्पादकांशी संवाद..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 जुलै 2021

सरकारच्या योजनेतून किंवा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृह तसेच हिरव्या मिरचीचे पावडर करण्यासाठीचे प्रक्रिया प्रकल्प उभारणार,

औरंगाबाद ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सध्या राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबवली जात आहे. राज्यातील प्रत्येक मंत्र्यांवर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Shiv Sampark campaigns directly on the farm Farm; Sattar interaction with chilli growers) राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असले तरी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तीन्ही पक्षांकडून अधूनमधून स्वबळाची भाषा केली जाते. या पार्श्वभूमीवरच उद्धव ठाकरे यांनी देखील शिवसेनेची ताकद शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून वाढवण्याचा व गाव तिथे शिवसेना, व पक्षाचे विचार पोहचवण्याचे आदेश दिले होते.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात ही मोहिम सुरू केली आहे. (Shivsena State Minister Abdul Sattar, Maharashtra) खेड्या-पाड्यात भेटीगाठी घेतल्यानंतर आता शिवसंपर्क मोहिम सत्तार यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नेली आहे. (Shivsampark Campaigning) तालुक्यातील काही गावांमधील शेतात जाऊन त्यांनी आज मिरची उत्पादकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समाजवून घेतल्या.

मिरची उत्पादक शेतकरी,, उत्पादक कंपन्या आणि  शेतमजुरांनी बचत गट स्थापन करावे, असे आवाहन यावेळी सत्तार यांनी केले.  तालुक्यातील मिरची साठवण व प्रक्रियेसाठी शिवना, भराडी , फर्दापूर येथे शीतगृह व प्रकल्प उभारणार असून यासाठी शासकीय स्तरावर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यातील मिरची लागवडीचे क्षेत्र दिवसागणिक वाढत असून सिल्लोडच्या मिरचीला बाजारात चांगली मागणी आहे.

शीतगृह, मिरची पावडर प्रकल्प उभारणार..

एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन होत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. याकरीता ज्या वेळी मिरची उत्पादित होते, त्यावेळी बाजारात भाव नसेल तर त्यावेळी मिरची साठवणीसाठी शिवना ,भराडी व सोयगावच्या फर्दापूर येथे सरकारच्या योजनेतून किंवा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शीतगृह तसेच हिरव्या मिरचीचे पावडर करण्यासाठीचे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सत्तार म्हणाले.

मिरची उत्पादक शेतकरी व शेतमजुर जर एकत्र आले तर या माध्यमातून तो स्वतःचा मिरची प्रकल्प उधोग उभारू शकतो, असा विश्वास व्यक्त करतांनाच मिरची उत्पादक, कंपनी  व शेतमजुरांनी बचत गट  स्थापन करावे जेणे करून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी शिवसंपर्कच्या माध्यमातून केले.

हे ही वाचा ः सरकार पडणार असं रोज सकाळी वाटतं, पण संध्याकाळ होईपर्यंत ते टिकतं..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख